Sunday, December 22, 2024
Homeराज्यखासदार प्रफुलभाई पटेलांनीच २०२४ ची भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक लढावी जनतेची, कार्यकर्त्यांची...

खासदार प्रफुलभाई पटेलांनीच २०२४ ची भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक लढावी जनतेची, कार्यकर्त्यांची व राजेशकुमार तायवाडे पत्रकार यांची मागणी…

भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास खासदार प्रफुलभाई पटेलच करु शकतात : राजेशकुमार तायवाडे पत्रकार…….
जनतेतून विविध प्रकारच्या चर्चेला आले उधाण…

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काही नेत्यांनी विविध विषय घेऊन गावोगावींच्या रस्त्यावर गल्लोगल्ली फिरने सुरू केले असतांना नुकतेच १ जानेवारीला भंडारा येथे संताजी तेली समाजाचा एक मेळावा आयोजित झाला. यात समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना समाजबांधवांनी साकडे घातले व असे न झाल्यास समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असाही दम भरण्यात आला.

२०२४ मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. यात सर्व आजी माजी खासदार व काही आमदारांनी यात उडी घेतली आहे. जातीनिहाय भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पाहिले तर तेली समाज २६०७५१ मते, कुणबी समाज २७७३६२ मते, पोवार समाज १७९०८० असा जातीय जनादेश आहे.

यात भंडारा जिल्ह्यात तेली २२८९८५, कुणबी २०८५५९ तर पोवार ३६०५८ तर गोंदिया जिल्ह्यात तेली ३१७७६, कुणबी ७०१०३ तर पोवार १४३०२३ अशी मतदार संख्या झाली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी उमेदवारी देतांना महायुतीतून खासदार प्रफुलभाई पटेल तर महाविकास आघाडीतून कोण राहणार हे निश्चित झालेले नसल्याने कॉंग्रेस यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

याकरीता प्रमुख पक्षांनी केंद्र व राज्य स्तरावर सर्वेक्षणही सुरू केले असले तरी भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास हा खासदार प्रफुलभाई पटेलच करु शकतात म्हणून 2024 ची लोकसभेची निवडणूक ही महायुतीकडून खासदार प्रफुलभाई पटेलांनीच लढावी अशी जनतेची व कार्यकर्त्यांची मागणी आहे.

प्रफुलभाई पटेल खासदार असतांनी अदानी विज प्रकल्प, धापेवाडा उपसा सिंचन योजना, भेल प्रकल्प, बिरशी विमानतळ असे अनेक मोठ मोठ प्रकल्प आणलेत ज्यामुळे लोकांना रोजगार मिळाले व शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झालीत म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार प्रफुलभाई पटेलांनीच लोकसभा निवडणूक लढावी अशी मागणी राजेशकुमार तायवाडे पत्रकार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, जनतेनी व कार्यकर्त्यांनी केलेली आहे.

भंडारा येथील तेली समाज कार्यक्रमात काही समाजबांधवांनी दमदार जनसंपर्क असलेल्या शिक्षण महर्षी डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांच्या नावाचा गजर केला होता. दूसरीकडे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांची गावोगावी रथ यात्रेच्या माध्यमातून जणू प्रचाराचा फंडा सुरू केला आहे असे जनतेतून बोलले जात आहे. की कधीकाळी आमच्या गावात न आलेले खासदार साहेबांना आज आमचे गाव कसे दिसले हे वाक्य ग्रामीण भागातील जनतेत चर्चेचा विषय ठरला आहे.

कारण भाजपाकडून प्रत्येक जनतेत जाऊन भरीव जनसंपर्क असलेल्या खंबीर उमेदवारांना दावेदारी दिली तर हा गड भाजपा वाचवू शकते असेही लोकांच्या तोंडून सोशल मिडीयावर वाक्य येत आहेत. काहींनी सोशल मिडीयाला प्रचाराचे मुख्य साधन बनविले असून विविध व्हाट्सअप समुहातून वृत्तपत्रांच्या बातमी कात्रणे टाकीत लोकांना पेपरवाल्यांनी दखल घेतली असे शेयरींग सुरू केले आहे.

तरी आज जनता जागृत झाली असून सर्वच जनता सोशल मिडीयाचा ८०% टक्के वापर करीत आहेत. यंदा लोकसभा निवडणूकीत आणीबाणीची निवडणूक होत असून नवा खासदार कोण असेल ते येथील जागृत झालेली जनताच उत्तर देणार आहे हे निश्चित.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: