Sunday, December 22, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी सर्वसामान्य जनतेच्या हिताचा पक्ष - माजी मंत्री रमेशचंद्र बंग…

राष्ट्रवादी सर्वसामान्य जनतेच्या हिताचा पक्ष – माजी मंत्री रमेशचंद्र बंग…

हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न

राकापा हिंगणा तालुकाध्यक्षपदी योगेश सातपुते यांची नियुक्ती…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -हिगणा -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर सह समस्त मानवतावादी महामानवांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र झाटणारा पक्ष असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने शेतकरी शेतमजूर कामगार व वंचित घटकासह सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे तरं भाजप पक्षाचे धोरण जातीवादी शेतकरी शेतमजूर व कामगार विरोधी आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 20 टक्के राजकारण व 80% समाजकारण करणारा पक्ष असल्याचे बंग पुढे म्हणाले. वानाडोंगरी हिंगणा मार्गावरील बाबळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर माजी आमदार विजय घोडमारे पाटील, अल्पसंख्याक सेलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, राकापा ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुदे, राकापा जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग,राकापा जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत,

राकापा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे ,राकापा महिला जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, राकापा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे, हिंगणा कृ.उ.बा समिती सभापती बबनराव अव्हाळे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष श्यामबाबू गोमासे, विठ्ठल कोहाड,उपसभापती उमेश राजपूत,

नागपूर ग्रामीण तालुकाध्यक्ष संजय कुंटे,अविनाश गोतमारे,पप्पू जैस्वाल, प्रेम झाडें, राजू चौधरी, अशोक लोहकरे, सुनील बोंदाडे,नौशाद सिद्दीकी, अमजद शेख, प्रमोद बंग, प्रेमलाल चौधरी, रामकृष्ण महल्ले, शेषराव उईके, राजेंद्र गोतमारे, आदी मंचकवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंगणा तालुका अध्यक्ष पदी योगेश सातपुते, जिल्हा उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम डाखळे, जिल्हा महासचिवपदी सुशील दीक्षित, जिल्हा उपाध्यक्षपदी लीलाधर दाभे, हिंगणा तालुका राकापा ओबीसी सेल अध्यक्षपदी हनुमंत दुधबळे यांना मान्यवारांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या इसासनी,वाघदरा, गणेशपूर टाकळघाट येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. असून सर्व प्रवेश कर्त्यांचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव अव्हाळे यांनी, सूत्रसंचालन राकापा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर दाभे तरं आभार पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता पुरुषोत्तम डाखळे,सुशील दीक्षित,गुणवंता चामाटे, प्रशांत सोमकुवर,दादाराव इटनकर, प्रवीण घोडे ,

प्रफुल काकडे,शोभा माहुरे,शारदा शिंगारे,सरला लोखंडे,मंगला उरकुडे, प्रभाकर लेकुरवाडे, नाना शिंगारे,दिनेश ढेंगरे, रवींद्र आदमने,विलास वाघ,मीना मेश्राम, बंटी भांगे,बबलू शेटे, प्रेमलाल कुवर,

श्याम फलके, संदीप नेहारे, दीपक वर्मा, राजाराम पांडे, बापूराब येळणे, मुकेश पाल, युसूफ पठाण, रामचंद्र टेकाडे, राजा तिवारी, राहुल पांडे, सुहास कोहाड,नंदू इटनकर,गोलू खंगार,हर्षल नंदनवार,आदींनी अथक परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: