Saturday, November 23, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी बुथ कमिटी आढावा बैठक निरीक्षक आ.शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न...

राष्ट्रवादी बुथ कमिटी आढावा बैठक निरीक्षक आ.शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात बुथ कमिटी आढावा बैठक घेण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी सांगली शहरजिल्ह्याच्या बुथ कमिटी चा आढावा सांगली जिल्हा निरीक्षक मा.आमदार शशिकांत शिंदे व मा.आमदार अरुण (आण्णा) लाड यांच्याकडून घेण्यात आला.

यावेळी आढावा बैठकीत राष्ट्रवादी चे सांगली जिल्हा निरीक्षक आ. शशिकांत शिंदे यांच्या कडे सांगली विधानसभा आणि लोकसभा जागा या राष्ट्रवादीला सोडण्यात याव्यात अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेस चे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी ते म्हणाले की सांगली विधानसभा आणि लोकसभेला आपल्या राष्ट्रवादी च्या बुथ कमिट्या सक्षम असल्यामुळे मतदानात चांगला प्रभाव हा कायम राहिलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला या ठिकाणी विधानसभा व लोकसभा लढण्याची संधी मिळत नाही , त्यामुळे आता कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मागणी आहे की राष्ट्रवादी ला निवडणूक लढवण्याची संधी मिळावी.

युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार म्हणाले की बूथ कमिट्या या आम्ही वर्षातून तीन ते चार कार्यक्रम आम्ही बुथ वर देऊन आम्ही बुथ सक्षम ठेवले आहेत. सांगली,मिरज अणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की बूथ अध्यक्ष हे खूप जबाबदारीचे आणि महत्वाचे पद आहे ,माझी कारकीर्दच ही बूथ अध्यक्ष म्हणून सुरु झाली आहे असे ते म्हणाले.

भाजप सरकार सत्तेमध्ये आल्या पासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, अनेक गोष्टी मधील घोटाळे समोर येत आहेत , विरोध करण्याऱ्यांना त्रास देण्याचे दबाव टाकण्याचे काम भाजप कडून केले जात आहे, त्यामुळे महाविकास आघाडी च्या माध्यमातून २०२४ ला आपण सर्वजण मिळून एकत्रित निवडणूक लढवून त्यांना सत्ते पासून लांब करायचे आहे,

कारण ते पुन्हा सत्तेत आले तर आपल्याला बोलून व फिरूनही देणार नाहीत , त्यामुळे आपण बुथ अजून सक्षम केले पाहिजेत असे ते म्हणाले. तसेच सांगली ची विधानसभा व लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी ला द्यावी ही आपली मागणी पक्ष श्रेष्ठीसमोर मांडतो, पण विधानसभेच्या आधी सांगली महानगरपालिका निवडणूक आहे त्यात मोठ्या ताकतीने बुथ च्या माध्यमातून काम करा व पुन्हा एकदा राष्ट्रवादी चा महापौर करून दाखवा.

राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब हे इथले नेते आहेत ते निर्णय घेतील असे ही आ. शशिकांत शिंदे म्हणाले.बुथ कमिटी आढावा बैठकीत राष्ट्रवादी चे उत्तम कांबळे यांना सामाजिक न्याय विभागाच्या सांगली शहरजिल्हाध्यक्ष पदाची व बिरेंद्र थोरात यांना शहरजिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली , जिल्हा निरीक्षक आ.शशिकांत शिंदे यांनी निवडपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार सागर घोडके यांनी मानले व कार्यक्रमाचा सांगता समारोप हा राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार ,महापौर दिग्विजय सुर्यवंशी , सुरेश पाटील , पद्माकर जगदाळे , मैनुद्दीन बागवान ,बाळासाहेब पाटील , धनपाल खोत ,

हरिदास पाटील , सागर घोडके , धनपाल खोत, विष्णू माने , शेडजी मोहिते ,तानाजी गडदे , योगेंद्र थोरात ,असिफ बावा ,उत्तम कांबळे, बिरेंद्र थोरात ,अनिता पांगम , वंदना चंदनशिवे ,छाया जाधव , समीर कुपवाडे , जुबेर चौधरी ,आयुब बारगिर , धनंजय पाटील ,डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे , उमर गवंडी ,

युवराज गायकवाड ,अभिजित कोळी ,अर्जुन कांबळे , किशोर हत्तीकर , संगीता जाधव , उषा गायकवाड , विद्या कांबळे , छाया पांढरे ,सुरेखा सातपुते ,विज्ञान माने ,संदीप व्हनमाणे , अजीत दुधाळ ,आकाराम कोळेकर , रामभाऊ पाटील ,डॉ पृथ्वीराज पाटील , मदन पाटील ,आशा पाटील ,सुनीता जगधने ,प्रियांका तुपलोंढे ,

युसुफ जमादार ,फिरोज मुल्ला , डॉ सतीश नाईक , प्रकाश सुर्यवंशी ,पिंटू माने ,कुमार वायदंडे, कुणाल गालिंदे , सोमनाथ सुर्यवंशी ,अमित पाटील ,विजय जाधव , अमीन शेख , इकबाल मुल्ला ,आदर्श कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी व बुथ अध्यक्ष उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: