केरळ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाने शनिवारी केरळच्या कोची किनारपट्टीवर 12,000 कोटी रुपयांच्या 2,500 किलो ड्रग्जची खेप जप्त केली. एजन्सीचा दावा आहे की ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग कन्साइनमेंट आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज एजन्सी आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त छाप्यात एका पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे भारतात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहीम ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
एनसीबीनुसार, मेथॅम्फेटामाइनला ‘डेथ क्रिसेंट’ असेही म्हणतात. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 12,000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय एजन्सीने ड्रग्ज घेऊन जाणारे ‘मदर शिप’ पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.