Friday, November 15, 2024
Homeराज्यनया अंदुरा, कारंजा रमजानपुर शिवभक्तांची जल्लोषात निघाली कावड यात्रा...

नया अंदुरा, कारंजा रमजानपुर शिवभक्तांची जल्लोषात निघाली कावड यात्रा…

नया अंदुरा – श्रावण सोमवारी मोठ्या जल्लोषात शिवभक्तनी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रावण सोमवारी नया अंदुरा व कारंजा रमजानपुर शिवभक्तांनी विविध पद्धतीने कावड सजविण्यात आली. अंदुरा पूर्णा नदीच्या पासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या अंत्री मलकापूर येथील महादेव मंदिर येथे पूर्णा नदीचा जल आणले व कावडधारी भक्तांची मोठ्या प्रमाणात अंत्री येथे गर्दी केली होती.

अंदुरा पुर्णा नदीचे पाणी कावडीने आणून अंत्री मलकापूर महादेवाला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्त शेगाव – अकोट महामार्गावर एकच गर्दी पाहावयास मिळाली. भव्य प्रमाणात शोभायात्रा व श्रावण सोमवारी नया अंदुरा व कारंजा रमजानपूर परिसरातील हजारो शिवभक्तांनी कावड सजविलेल्या नया अंदुरा व कारंजा रमजानपुर गावांमधून शोभायात्रा काढण्यात आली

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: