गडचिरोली – मिलिंद खोंड
भामरागड तालुक्यात १० किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम हिदुर गावात नवनिर्माण रस्ते बांधकाम सुरु होते त्या बांधकामावरील नक्षल्यानी मध्यरात्री एक जेसीबी, टँकरची जाळपोळ करून पत्रके टाकून २२ डिसेंबर रोजी बंदचे आवाहन केल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनिर्माण रस्ते बांधकाम हीदुर ते दोबुर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे मागील काही दिवसांपासून बांधकाम सुरू असून नक्षल्यांचा या बांधकामाला विरोध आहे. कारण हा रस्ता जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या छत्तीसगड राज्याला जोडणारा आहे.
प्रशासन या मार्गाला जोडून विकसनशील नक्षल मुक्त गडचिरोली करण्यासठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच या रस्त्याच्या बांधकामासाठी सदैव प्रयत्नशील आहेत, अशातच नक्षल्यानी बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची जाळपोळ करून त्या ठिकाणी पत्रक टाकून २२ डिसेंबर रोजी भारत बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
नक्षल्यानी नुकतेच काही दिवसांपूर्वी २ ते ८ डिसेंबर पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलिसांचे खबरी असल्याच्या कारणावरून तीन निरपराध आदिवासी युवकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा रस्ता बांधकामातील एक जेसीबी, टँकरची जाळपोळ करून संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान केले आहे. तर ग्रामीण भागात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे, या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.