Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअहेरी | नक्षलवाद्यांनी पुन्हा केली एका युवकाची हत्या…महिनाभरातील तिसरी घटना...

अहेरी | नक्षलवाद्यांनी पुन्हा केली एका युवकाची हत्या…महिनाभरातील तिसरी घटना…

कापेवनचा येथील घटना…दक्षिण गडचिरोली भागात हत्यासत्राने दहशतीचे वातावरण…

अहेरी – मिलिंद खोंड

दक्षिण गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून महिनाभरात नक्षलवाद्यांनी तीन इसमांची हत्या केली आहे. त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम उप- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गम भाग असलेल्या कापेवंचा येथील रामजी आत्राम या युवकाची शुक्रवारी नक्षलवाद्यांनी शेतात जाऊन गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

आपल्या शेतात काम करीत असताना संध्याकाळच्या सुमारास आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी शेतात जाऊन गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यामुळे महिनाभरात नक्षलवाद्यांनी केलेली ही तिसरी हत्या असून या घटनांमुळे दक्षिण गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढून रक्तपात सुरू केला आहे.

याआधी दिवाळीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: