Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीगडचिरोली | नक्षल्यांकडून पुलाच्या कामावरील वाहनांची जाळपोळ, एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी-आलेंगा मार्गावरील घटना...

गडचिरोली | नक्षल्यांकडून पुलाच्या कामावरील वाहनांची जाळपोळ, एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी-आलेंगा मार्गावरील घटना…

गडचिरोली – 3 मार्च

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्या आहेत.गुरुवारी रात्री एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली आली.

गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावर सुरू आलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी उभे असलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यात 1 जेसीबी,1पोकलॅन आणि 1मिक्सरमशीनचा समावेश आहे. यावेळी 15 ते 20 सशस्त्र नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातील विसामुंडी मार्गावर देखील एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: