Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayनवाजुद्दीनचा नविन चित्रपट…'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…कसा आहे ट्रेलर?...पहा...

नवाजुद्दीनचा नविन चित्रपट…’जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज…कसा आहे ट्रेलर?…पहा Video

मुंबई – गणेश तळेकर

नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे, पण यावेळी त्याच्या व्यक्तिरेखेत कॉमेडीच्या रुपात पाहायला मिळत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत नेहा शर्मा सोबत जोडी दिसत आहे आणि लोक पसंत करत पण करत आहेत.

हा ट्रेलर रिलीज करताना सांगण्यात आले आहे की हा एक स्वच्छ कौटुंबिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये ट्विस्ट, रिस्क आणि जुगाड देखील आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट गालिब असद भोपाली यांची आहे, जी लोकांना खूप आवडली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, संजय मिश्रा, नेहा शर्मा आणि महाक्षय चक्रवर्ती स्टारर फॅमिली कॉमेडीचा ट्रेलर रिलीज केला आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात नवाज त्याच्या आत्तापर्यंतच्या पात्राव्यतिरिक्त वेगळ्या भूमिकेत दिसनार आहे.

चित्रपटातील नवाज यांचे नाव जोगी आहे, जो लग्न लावून देण्याचे काम करतो. ट्रेलरमध्ये त्यांचा एक संवाद आहे – “जोगी का जुगाड कभी फेल नाही होता “. नवाजुद्दीन जुगाड जोडून लोकांना कशी मदत करतो आणि या कामातून पैसेही कमावतो, हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आले आहे.

यादरम्यान, त्याला लग्न मोडण्यासाठी धडपड करावी लागते, परंतु नंतर त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. नंतर, नवाजुद्दीन सिद्दीकी ज्या मुलीला (नेहा शर्मा) लग्न तोडण्यास मदत करतो, शेवटी ती त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरते. ‘जोगिरा सारा रा रा’ चे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले आहे. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संजय मिश्राही एका मजेशीर भूमिकेत दिसणार आहे. लोकांना नेहाची नवाजुद्दीनसोबतची जोडी पसंत केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: