चंद्रपूर – ऍड.योगिता रायपुरे
‘बहुजन समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन,शैक्षणिक,समाजिक प्रबोधन होण्याच्या दृष्ट्रीने बहुजन समाजातील महानायिका व संत विचारांचा नवरात्र जागर महोत्सव’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन संविधान सभागृह, बळीराजा पॅलेस, गडचिरोली येथे करण्यात आले असून,रोज सायंकाळी 5:30 ते 8:30 या वेळात नऊ दिवस हा जागर महोत्सव असणार आहे.
एकीकडे कल्पनेच्या बाजारात नाही नाही ते पेरुन ठेवून भोळ्या लोकांना अंधश्रद्धेकडे नेण्याचा डाव वर्षानुवर्षे प्रतिगामी सामाजिक व्यवस्था करीत आली आहे. आणि या नवरात्रीमध्ये पर्यायी कार्यक्रम आपल्याकडे नसल्याने बहुजन समाजातील लोक प्रतिगामी उपक्रमाकडे आपसूकच वळत आहेत. परिवर्तनाच्या विचारांचा वसा घेउन कार्य करणा-या मंडळींनी बहुजन समाजाची उत्सव प्रियता लक्षात घेउन समर्पक विकल्प देणे गरजेचे आहे.
या पर्यायी पद्धतीतून नव्या संस्कारांची नव्या परिवर्तनाची वाट प्रशस्त होउ शकेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.बहुजन समाजातील वैचारिक प्रेरणास्रोत लाभलेल्या महानायिका व संताचा विचार पसरविणेसाठी ‘जागर नवरात्र महोत्सव’ या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांचे म्हणणे असून, दिनांक 03 ते 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवरात्र नऊ दिवस दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष हजर राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
कलावंतांना संधी…
नकला, पोवाडे, कलापथक, पथनाट्य, गीत गायन, कविता, एकांकिका, भजन, महानायकांवर लघु भाषण इत्यादी विविध उपक्रम इत्यादी कला असणाऱ्या कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्याची संधीही या महोत्सवातून देण्यात आलेली आहे.या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून २०२३ मध्ये हा महोत्सव यशस्वी ठरला होता…
या आगळ्या वेगळ्या परिवर्तन वादी महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रवृत्ती वाळके- 8805117361,सतिश कुसराम- 7492462079, शीतल नरवडे-7588377343,सुधा चौधरी- 8208923701,
इत्यादी नंबरवर संपर्क साधन्याची विनंती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांचे मुख्य आयोजक सोशल एज्युकेशन मुव्हमेंट,जिल्हा माळी समाज संघटना, आदिवासी विकास परिषद, जंगोरायताड आदिवासी महिला संघटना, सत्यशोधक फॉउंडेशन यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून हा नवरात्रीय महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन बहुजन समाजाला केले आहे.