गुजरातमधील खेडा येथील उंडेला गावात सोमवारी रात्री नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित गरबा सुरु असतांना एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून, सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरिफ आणि झहीर नावाच्या दोन लोकांच्या नेतृत्वाखालील गटाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि काही वेळाने सर्वांनी दगडफेक सुरू केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनेक जण इकडून तिकडे धावताना दिसले पण काहीजण त्यात अडकले.
सर्व आरोपींची ओळख पटली : डीएसपी
घटनेची माहिती देताना खेडाचे डीएसपी राजेश गढिया म्हणाले की, सर्व आरोपींची ओळख पटवली जात असून कठोर कारवाई केली जाईल. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
दगडफेकीनंतर उंढेला गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेतला जात आहे. या घटनेत एका वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात दगडफेक
त्याचवेळी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील सावली शहरात धार्मिक ध्वज लावण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि दगडफेक सुरू झाली. याप्रकरणी 40 जणांना अटक करण्यात आली आहे. सावली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, धमीजी का डेरा परिसरात एका विद्युत खांबावर ध्वजासह धार्मिक ध्वज लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या समाजातील लोकांचा एका गटाने निषेध केल्याने शनिवारी रात्री ही घटना घडली.