सांगली – ज्योती मोरे.
शाळेचे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना कुंभार मॅडम व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकराव पवार सरांच्या हस्ते ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ.तृप्ती पाटील मॅडम यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवन तसेच यांना मिसाईल मॅन म्हणून का ओळखले जाते.
त्यांचे संशोधन व त्यांनी केलेले काम तसेच अब्दुल कलामांचे मत की राष्ट्राचा खरा विकास व्हावयाचा असेल तर तो शाळेतील वर्गामध्ये होत असतो. विद्यार्थ्यांना स्वतःला सक्षम बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपले बौद्धिक ज्ञान वाढवले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सखोल वाचन करणे गरजेचे आहे. वाचनाने आपले मस्तक सुधारते व सुधारलेले मस्तक दुसऱ्यांसमोर नतमस्तक होत नसते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी लागली पाहिजे.
जेणेकरून विद्यार्थ्यांना सारासार विचार करण्याचे कौशल्य हे वाचनामुळेच प्राप्त होते. वाचनामुळे माणसातील पशुत्व नाहीसे होऊन मनुष्यत्व प्राप्त होते असे मत विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून सांगितले. त्यानंतर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना कुंभार मॅडम यांनी प्रथम अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून भारताचे माजी राष्ट्रपती यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतात याची माहिती सांगितली. ए.पी.जे. अब्दुल कलामाचे बालपण अतिशय कष्टामध्ये केले.
वडिलांचे मृत्यू व घरातील व्यक्तींची संख्या जास्त यामुळे त्यांना चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र घरोघरी पोहोचविण्याचे काम लहानपणापासून करीत होते .त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. हेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. जसं बुद्धीच्या विकासासाठी वाचन करणे गरजेचे आहे तसेच आपले शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे.
त्यामुळे 15 ऑक्टोबर हा हात धुणे दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून आज हात धुणे या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शारीरिक स्वच्छता नेहमीच ठेवावी असे याप्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
ए.पी.जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचा जन्म दिवस हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. विद्यार्थी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. अमृता चव्हाण यांनी केले.
आभार सौ. सरिता पाटील यांनी मांडले कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ वंदना कुंभार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. अधिकराव पवार सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. ललिता गौंडाजे व सौ. विनिता रावळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.