सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रतिवर्षी शालेय जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होत असते सदर स्पर्धा दिनांक 3 ते 8ऑगस्ट दरम्यान सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धा ह्या 17 वर्षाखालील गटामध्ये होत्या सुरुवातीस अण्णासाहेब डांगे स्कूल आष्टा यांना तीन गोलने तसेच दुसऱ्या स्पर्धेमध्ये प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर यांना तीन गोलने व सेमी फायनल मध्ये शांतोम स्कूल सांगली यांना 3 गोलनी हरवून फायनल स्पर्धेमध्ये झील इंटरनॅशनल स्कूल ला एक गोलने नमवून नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम ने चित्तथरारक विजय प्राप्त केला.
या स्पर्धेमध्ये सलग पाचव्या वर्षी विजय प्राप्त केला आहे नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे नव कृष्णा व्हॅली फुटबॉल अकॅडमी असून त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या मार्फत दैनंदिन सराव सुरू असतो त्यासाठी एक राष्ट्रीय मैदान तयार करण्यात येणार आहे व सांगलीमध्ये व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे यासाठी संस्थेचे संस्थापक मा प्रवीणजी लुंकड यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभत आहे त्याचबरोबर संस्थेचे सचिव एन जी कामत व संस्थेचे डायरेक्टर सौ संगीता पागनीस तसेच विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम संतोष बैरागी इन्चार्ज गुरुकुल विभाग तसेच रघुनाथ सातपुते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीशैल मोडगी अकाउंट विभाग राजेंद्र पाचोरे आयटी विभाग प्रशांत चव्हाण उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम प्रशिक्षक किशन भास्कर व फिजिकल डायरेक्टर सुशांत सूर्यवंशी तसेच नामदेव नलवडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे l या विजयामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.