Tuesday, December 24, 2024
Homeखेळनव कृष्णा व्हॅली स्कूल विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेस निवड…

नव कृष्णा व्हॅली स्कूल विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेस निवड…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन सांगली व नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड आयोजित पंधराव्या जुनियर व चौदाव्या सब ज्युनिअर नेटबॉल निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 9 ऑक्टोंबर 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.*

सदर स्पर्धेसाठी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम चे मुख्याध्यापक श्री अधिक राव पवार सर व सुरज स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव श्री विनायक जोशी, तसेच जिल्हा संघटनेचे सचिव श्री एस एल पाटील सर, सहसचिव जितेंद्र पाटील सर शिवाजी वाडकर, सुशांत सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून आठ शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी सौ संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन व प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी उपप्राचार्य श्री प्रशांत चव्हाण व विनायक जोशी सचिव सुरज स्पोर्ट्स अकॅडमी त्याचबरोबर क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी व नामदेव नलवडे हे उपस्थित होते

निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
सब जुनियर मुली
1) स्नेहल भोसले
2) तनिष्का मेटकरी
3) आदिती यादव
4) आदिती माने
सब ज्युनियर मुले
1) श्रेयस माने
2) प्रतीक पाटील
3) जयेश भोसले
4) आदित्य साळे –
5) आर्यन थोरात
6) आदित्यवर्धन कांबळे
7) शिवराज पडळकर
जूनियर गर्ल्स
1) आदिती कुपवाडे
2) तनिष्का नलवडे
3) हर्षा खुडे
जूनियर मुले
1) शुभम मेटकरी
2) आदित्य भंडारे
3) हर्ष तोडकर
4) हितेश बजबले
5) प्रज्वल जाधव-
6) चैतन्य देवरुखकर
7) प्रसाद बिसनकोप

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज कडून हार्दिक अभिनंदन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: