Sunday, December 22, 2024
Homeराज्यनव कृष्णा व्हॅली स्कूलला शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप...

नव कृष्णा व्हॅली स्कूलला शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मान्यतेने शालेय जिल्हास्तरीय 14 व 17 वर्षाखालील जलतरण स्पर्धा क्रीडा संकुल येथे पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले व जनरल चॅम्पियनशिप मिळवली कृष्णा व्हॅली स्कूल येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन जलतरण तलावात पाहण्याचे धडे श्री नामदेव नलावडे हे देत असतात.

त्यामुळेच हे विद्यार्थी यश संपादन करू शकले कृष्णा व्हॅली स्कूल हे स्पोर्ट्स हब म्हणून ओळखले जाते नुसते प्रशिक्षक न नेमता त्या खेळामध्ये प्रोफेशनल कोचिंग म्हणजेच शाळेच्या आधी व शाळा सुटल्यानंतर असे दररोज दोन वेळा विविध खेळाचे प्रशिक्षण सुरू असते त्यामुळेच प्रत्येक खेळाडू हा चांगला घडेल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते सुरज फाउंडेशन संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीणजी लुंकड सचिव एन जी कामत मा संगीता पागणीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन श्री प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम श्री विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी व क्रीडा शिक्षक श्री सुशांत सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले निकाल पुढील प्रमाणे आहे.

1)आयुष कोठे-1)50m फ्री स्टाईल प्रथम 2) 100 m फ्री स्टाईल प्रथम 3)200m इंडिव्हिज्युअल मिडले प्रथम 4)4×100 फ्री स्टाईल रिले प्रथम 5)4 ×100 मिडले रिले 2) हर्षित कुंभार -1)50m बॅकस्ट्रोक प्रथम 2)100m बॅकस्ट्रोक प्रथम 3)50m बटरफ्लाय प्रथम 4)4×100 फ्री स्टाईल रिले प्रथम 5)4 ×100 मिडले रिले प्रथम

3)वेदांत कलाल – 1)200m फ्री स्टाईल प्रथम 2)50m ब्रेस स्ट्रोक द्वितीय 3)100mब्रेसस्ट्रोक द्वितीय 4)4×100 फ्री स्टाईल रिले प्रथम 5)4 ×100 मिडले रिले प्रथम श्लोक शिंदे- 1)4×100 फ्री स्टाईलरिले प्रथम 6)आरव धडसूल-4 ×100 मिडले रिले प्रथम 6) श्रेयश माने-1)100mब्रेसस्ट्रोक द्वितीय 2)50mब्रेसस्ट्रोक द्वितीय 7)तेजस्विनी कुंभार 1)50mफ्री स्टाईल प्रथम

2)50m बॅक स्ट्रोक प्रथम 3)ब्रेसस्ट्रोक प्रथम 8) ऋतुजा गणे-1)50m बटरफ्लाय प्रथम 2)50m ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय 3) 50mफ्री स्टाईल द्वितीय 9 ) स्नेहल भोसले -1)50m ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम 2)50m बटरफ्लाय प्रथम 3) 50mफ्री स्टाईल द्वितीय 10)प्रगती भजभले-1)100mब्रेसस्ट्रोक प्रथम 2)200mब्रेसस्ट्रोक प्रथम 3)50mब्रेसस्ट्रोक द्वितीय.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: