Saturday, November 23, 2024
Homeशिक्षणसुरज फौडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/गुरुकुल शाळेमध्ये खंडेनवमी निमित्त...

सुरज फौडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम/गुरुकुल शाळेमध्ये खंडेनवमी निमित्त मल्टीस्किल विभागांमध्ये असणाऱ्या विविध साहित्यांचे पूजन…

सांगली – ज्योती मोरे

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याहेतूने शाळेने सन 2017 पासून मल्टि स्किल फौंडेशन कोर्स ची सुरवात केली.यामधून विद्यार्थाना शेती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण,अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान इत्यादी विषयांची प्रात्यक्षिके घेतली जातात. शेती तंत्रज्ञान विभागांतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीच्या कामाचे ज्ञान अवगत व्हावे या हेतूने बागकाम तंत्रज्ञान, रोपवाटिका तंत्रज्ञान ,सेंद्रिय खत तयार करणे ,शेतीच्या मशागतीची कामे करणे, भाजीपाला लागवड इत्यादीचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.

अभियांत्रिकी विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना वेल्डिंग करणे , दैनंदिन जीवनात लागणाऱ्या घरगुती वस्तू उदाहरणार्थ टेबल-खुर्च्या , पाट तयार करणे ,तसेच बांधकामाचे प्राथमिक ज्ञान प्रत्यक्ष कृतीद्वारे दिले जाते. ऊर्जा आणि पर्यावरण या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल साहीत्य माहिती व हाताळणी, सर्किट तयार करणे, अर्थिंग विषयी माहिती, हाउस वायरिंग विषयी प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.

अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धती, संतुलित आहार, पदार्थातील भेसळ ओळखणे, केक, लोणची, जाम, अप्पे, बिस्किट, शेंगदाणा चिक्की तसेच विविध प्रकारच्या चटण्या तयार करणे, त्याचबरोबर तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे लेबलिंग व पॅकिंग करणे इत्यादीचे ज्ञान दिले जाते याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअर निवडीसाठी होतो.

या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या घरी स्वतः फॅन दुरुस्ती करणे, फॅन बसवणे, फ्यूज दुरुस्ती करणे, सर्किट चेक करणे, तसेच घरगुती खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे. सुपल्या, विळती, कुंड्या -स्टँड तयार करून त्याची विक्री केलेली आहे. अशाप्रकारे आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बहुविध कौशल्याधिष्ठित या कोर्समधून अभ्यासाबरोबरच भविष्यामध्ये लघुउद्योग त्यांना सुरु करता येईल एवढे ज्ञान प्राप्त केलेले आहे असे दिसून येते.

इयत्ता आठवी पासून हा कोर्स विद्यार्थ्यांना शिकवला जातो. संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रवीण शेठजी लुंकड , सचिव एन जी कामत , संस्थेच्या संचालिका सौ संगीता पागनीस, मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार ,मल्टी स्किल कोर्स चे प्रमुख श्री अनिरुद्ध बनसोड सर, प्रोग्राम ऑफिसर दिपाली खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स सुरू आहे.

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवातून स्वावलंबनाचे धडे देण्याचे काम प्रोग्राम कॉर्डिनेटर पांडुरंग जाधव, त्याचबरोबर निदेशक सुफियान नदाफ, विनायक कदम, सौ.रचना वाघ व कु. मानसी पवार करत आहेत. याप्रसंगी प्रशालेचे माध्यमिक विभाग प्रमुख मा. श्री अधिकराव पवार सर , प्राथमिक विभाग प्रमुख मा.सौ वंदना कुंभार, मल्टी स्किल विभागाच्या समन्वयक सौ सुनीता भोसले त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: