सांगली – ज्योती मोरे.
दि.26 जून 2023 रोजी सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल व पोलीस स्टेशन एम.आय डी. सी. कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरज ललित कला अकॅडमी मध्ये जागतिक अमली पदार्थ दिन साजरा करण्यात आला.
व्याख्यानासाठी श्री अविनाश पाटील(A.P.I) व डॉ. अजित पाटील उपस्थित होते यावेळी डॉ. अजित पाटील यांनी आपल्या व्याख्यानात अमली पदार्थांचे दुष्परिणाम व उपाय सांगितले.
टेन्शन च्या नावाखाली नशाधुंद झालेली माणसेच समाजामध्ये जास्त दिसतात. गांजा, भांग, तंबाखू, गुटखा, सिगारेट व दारू च्या विळख्यातील व्यक्तींना त्यांचे दुष्परिणाम अल्पकाळात भोगावे लागतात. खेड्यापाड्यात तंबाखू सेवनाने तर शहरांमध्ये धुम्रपानाचे व गुटखा सेवनाचे प्रमाण जास्त आहे.
भारतात सुमारे 14 कोटी पुरुष व 4 कोटी स्त्रिया तंबाखूच्या वेगवेगळ्या व्यसनाच्या अधीन आहेत असे आढळून आले आहे. सिगारेटच्या धुरात चारशे प्रकार चेअपायकारक रसायनांचा समावेश आहे. धूम्रपान करणाऱ्यांना घशाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असते या धुरामुळे आसपासच्या निर्व्यसनी लोकांच्या फुफुसावरही परिणाम होतो.
वेगवेगळ्या मदय सेवनाने मदयातील अल्कोहोल मूळ मज्जा संस्थावर, स्नायू संस्थेवर, पचनसंस्थेवर ,यकृतावर व हृदयावरही वाईट परिणाम करते. अफु, मार्फिन सेवनाने श्रवण क्रियांवर विपरीत परिणाम होतो. शरीराने व मनाने कायमचा निकामी होतो.
मानवी जीवनाची कित्येक कुटुंबांची चाललेली विनाशकारी वाटचाल राष्ट्रहितासाठी बाधक ठरत आहे असे सांगितले
डॉ. अविनाश पाटील यांनी अमली पदार्थाच्या सेवनाने व्यक्तीची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक हानिकारक दुर्दशा होते.
अशी अवस्था होऊ नये यासाठी समुपदेशन, व्यसनमुक्ती केंद्र,लोकशिक्षण, प्रबोधन ,प्रचार जागृती सामाजिक संस्थांनी करायला हवी. बंधने, शिक्षा, दंड व्हायला हवेत यासाठी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो. असे सांगितले.
डॉ. अजित पाटील यांचा सत्कार श्री अविनाश पाटील यांच्या हस्ते बुके देऊन करण्यात आला करण्यात आला. श्री. अविनाश पाटील यांचा सत्कार मराठी माध्यमचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. अधिकराव पवार सर यांच्या हस्ते बुके देऊन करण्यात आला. सकाळ सत्रात ,नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये व्याख्यानमालेवर आधारित *पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
१.अमली पदार्थांचे दुष्परिणाम
२. व्यसनमुक्ती काळाची गरज ३. अमली पदार्थ सेवन कारणे व उपाय
४.अमली पदार्थाची नशा ,होईल आयुष्याची दुर्दशा.
निबंध स्पर्धेसाठी मराठी माध्यमचे विद्यार्थी सहभागी होते यावेळी संस्थेचे सचिव श्री. एन जी. कामत सर, श्री अविनाश पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या व्याख्यानास मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकराव पवार सर , इंग्रजी व मराठी माध्यमाचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता पाटील यांनी केले.