Monday, December 23, 2024
Homeखेळनव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ...

नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ…

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्नयुनिअर कॉलेज मार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा माणिक वाघमारे क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीस मार्च पास होऊन पाहुण्यांना सलामी देण्यात आली त्यानंतर ऑलिंपिक ज्योत प्रमाणे विद्यार्थ्यांनी 400 मीटर ट्रॅक द्वारे रनिंग करून ज्योत पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर संगीत शिक्षक गुरव सर व विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वागत गीत सादर करण्यात आले.

त्यानंतर स्टेजवरील कार्यक्रमास सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक मा प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांनी पाहुण्यांचा परिचय व खेळाविषयी माहिती सांगितले त्यानंतर मा माणिक वाघमारे यांचा सत्कार मा.संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन यांच्यामार्फत करण्यात आला त्यानंतर मा माणिक वाघमारे क्रीडा अधिकारी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी दररोज खेळाचा सराव केलाच पाहिजे खेळासाठी विविध योजनांची माहिती सांगून त्याचे महत्त्व व फायदे सांगितले तसेच तसेच नव कृष्णा व्हॅली येथे क्रीडा संकुल बरोबर सुविधा असल्याचे स्पष्ट करून त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व व प्रत्येक खेळास स्वतंत्र शिक्षक आहेत.

त्यामुळे निश्चित आपण राज्य राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवाल याची खात्री असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर मा विनायक जोशी यांनी आभार व्यक्त केले पाहुण्यांच्या हस्ते 100 मीटर धावणे या प्रकाराची सुरुवात क्लापर मार्फत सुरुवात करण्यात आली त्यानंतर 100 200 400 व 800 मीटर चे धावण्याचे स्पर्धा तसेच लांब उडी गोळा फेक थाळीफेक तसेच बास्केटबॉल फुटबॉल व्हालीबॉल कबड्डी खोखो जलतरण अशा विविध प्रकारच्या दिनांक 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक सुशांत सूर्यवंशी व नामदेव नलवडे यांनी सांगितले आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी मा अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मा गीतांजली देशमुख एच आर सुरज फाउंडेशन त्याचबरोबर राजेंद्र पाचोरे आयटी इनचार्ज सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: