सांगली – ज्योती मोरे.
नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पाठ्यक्रमावर आधारित तंत्रज्ञान अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉक्टर यशवंत सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या समारंभामध्ये यू.एस.ए. क्लबच्या निशा तलगला मॅडम यांनी ए.आय या विषयीचे आपले विचार व त्यांच्या संस्थेची उद्दिष्टे व संस्थेबाबत सविस्तर माहिती देऊन संस्थेचा परिचय करून दिला.
यावेळी नव कृष्णा व्हॅली स्कूल च्या वतीने संस्थेचे ट्रस्टी मा.श्री प्रवीण लुंकड व ए.आय. क्लब यांच्यावतीने डॉक्टर निशा तलगला मॅडम यांनी करारावर स्वाक्षऱ्या करण्याचा ऑनलाइन कार्यक्रम संपन्न झाला. या नंतर निशा मॅडम यांनी शिक्षणामध्ये ए.आय. विषय बद्दलचे महत्त्व पटवून सांगितले.
मा.प्रवीण लुंकड सर यांनी नव कृष्णा व्हॅली स्कूल नेहमीच नव -नवीन प्रणाली विद्यार्थ्यांना देण्यासाठी अग्रेसर असते. त्यामधील महत्वपूर्ण एक भाग म्हणजे ए आय क्लबशी करार असे संबोधन संस्थेचे ट्रस्टी मा. प्रवीण सर यांनी केले.
तसेच सिंधू घनता मॅडम यांनी ए.आय.हा विषय विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अध्यापन केला जाणार आहे याची माहिती व फायदे सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी श्री एन.जी. कामत संचालिका सौ. संगीता पागनीस, मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार, तसेच संस्थेचे सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
संचालिका संगीता पागनीस मॅडम यांनी नवीन तंत्रज्ञानातील आधुनिक अभ्यासक्रम आपण सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आमची संस्था नेहमीच तत्पर असल्याची ग्वाही दिली.व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.