Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingनाट्य परिषदेचे व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर...

नाट्य परिषदेचे व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर…

व्यावसायिक नाटक पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकास, तर संगीत नाटक पुरस्कार ‘डबल लाईफ’ नाटकास

  • प्रायोगिक नाटक पुरस्कार ‘i m पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ’, प्रायोगिक संगीत नाटक पुरस्कार ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटकास

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल स्मृति पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. या पुरस्कारांसोबतच प्रतीवर्षी व्यावसायिक व प्रायोगिक मराठी रंगभूमीवरील सर्व विभागातील कलावंत, तंत्रज्ञ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

यावर्षीचे व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार श्री. संकर्षण कऱ्हाडे (नाटक – नियम व अटी लागू) यांना तर मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक दिग्दर्शकाचा पुरस्कार श्री. चंद्रकांत कुलकर्णी (नाटक – नियम व अटी लागू) यांना, नेपथ्यकार विभागाचा पुरस्कार श्री. संदेश बेंद्रे (नाटक – २१७ पद्मिनी धाम) , तर प्रकाश योजना पुरस्कार श्री. अमोघ फडके (नाटक- जर तर ची गोष्ट), पार्श्वसंगीतकार पुरस्कार श्री. सौरभ भालेराव (नाटक – आजीबाई जोरात), रंगभूमीवरील रंगभूषाकार पुरस्कार श्री. उल्लेश खंदारे (नाटक – कुर्र ) या नाटकास.

यावर्षी मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक म्हणून ‘नियम व अटी लागू’ या नाटकास पुरस्कार जाहीर करण्यात आला. व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून श्री. संकर्षण कऱ्हाडे (नाटक -नियम व अटी लागू) यांना तर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून श्री. मयुरेश पेम (नाटक -ऑल द बेस्ट), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार श्री. आशुतोष गोखले (नाटक – जर तर ची गोष्ट) या नाटकासाठी मिळाला.

मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यावर्षी श्रीमती लीना भागवत (नाटक – इवलेसे रोप) यांना जाहीर करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून श्रीमती शलाका पवार (नाटक- हीच तर फॅमिलीची गंम्मत) तर सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार श्रीमती पर्ण पेठे (नाटक – चार चौघी), तसेच मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक म्हणून रंगशारदा प्रतिष्ठान या संस्थेच्या ‘डबल लाईफ’ या नाटकाची निवड करण्यात आली.

तसेच प्रायोगिक, हौशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या संस्था व कलावंतांना प्रतीवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.यावर्षी प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीत नाटक पुरस्कार, परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई या संस्थेच्या ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटकास जाहीर करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक पुरस्कार नवी मुंबईच्या शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, नवीमुंबई या संस्थेच्या ‘i m पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ’ या नाटकास जाहीर करण्यात आला.

प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार श्री. विवेक बेळे यांना , तर प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार म्हणून श्री. प्रशांत निगडे तर प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कु. बकुळ धवने (नाटक – दि फिअर फॅक्टर) यांना, तर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता म्हणून विशारद गुरव (नाटक – संगीत जय जय गौरीशंकर) यांना, तर प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री म्हणून शारदा शेटकर (नाटक -संन्यस्त खड्ग) , तर प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार इरफान मुजावर यांना जाहीर करण्यात आला आहे.

सर्व पुरस्कार प्राप्त कलावंतांना १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मनमाला टँक रोड मांटुगा – माहीम मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: