Sunday, September 22, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर...

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर…

सांगली — ज्योती मोरे.

आज राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सांगली शहरजिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी यांना निवड पत्र देण्यात आले.

तसेच जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त संजयजी बजाज साहेब यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक मा.सुभाष तोडकर आणि विश्वास लोंढे या पक्षातील जेष्ठ पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. उत्तम आबा कांबळे यांनी स्वागत केले व कार्याध्यक्ष बिरेंद्र थोरात यांनी आभार मानले.

यावेळी मुख्य सचिव डॉ. शुभम जाधव, ग्राब्रियल तिवडे, सुभाष तोडकर,निलेश शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे

१) भारत चौगुले- उपाध्यक्ष
२) संतोष कांबळे – उपाध्यक्ष
३) महादेव कांबळे – उपाध्यक्ष
४) आदर्श कांबळे – सचिव
५) कबीर व्हनकटे – सचिव
६) विश्वास लोंढे- संघटक
७) प्रफुल्ल गोल्हार – संघटक
८) किरण चव्हाण – सरचिटणीस
९) आकाश कोलप – संघटक

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: