सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात महिला धोरण राबवून स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महिलांना आरक्षण दिले आहे.महिलांना संधी मिळाली तर त्या चांगले काम करतात.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना मिळालेल्या आरक्षणाने हे सिद्ध केले आहे.कायदेमंडळात ही संधी मिळाली तर महिला तेवढ्यात ताकदीने काम करतील.
कायदेमंडळात महिलांना आरक्षण मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आग्रही आहे असे प्रतिपादन खासदार डॉ.फौजिया खान यांनी केले.त्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या.यावेळी प्रा.कविता म्हेत्रे अध्यक्ष प.महाराष्ट्र यांनी पक्षकार्य अहवाल सादर केला. आढावा बैठकीला सांगली जिल्हा निरीक्षक स्नेहल मठपती,सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम ,मिरज अध्यक्षा वंदना चंदनशिवे,शहरजिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे ,कुपवाड अध्यक्षा वैशाली कळके, सोलापूर जिल्हा निरीक्षक विनया पाठक,उल्का माने, संध्या आवळे ,आयेशा शेख , सुजाता पाटील,छाया जाधव,संगीता जाधव,राणी कदम ,सांगली शहर उपाध्यक्ष इ.प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना फौजिया खान म्हणाल्या, शरद पवारांनी महाराष्ट्रात महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.त्याचा परिणाम म्हणून अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमठवलेला दिसतो.राष्ट्रवादी महिला काँग्रेस कायदेमंडळात महिला आरक्षणाची मागणी करत आहे.ह्यासाठी देशभर कायदेमंडळात महिलांना आरक्षण मिळावे म्हणून सह्याची मोहिम राबवत आहे.
बेटी बचाव बेटी पढाव ची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर कायदेमंडळात आरक्षण देऊन महिलांना आमदार खासदार बनण्याची संधी द्यावी.यासाठी येणाऱ्या काळात आंदोनात्मक भूमिका ही राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस घेणार आहे.
यावेळी बोलताना मोदी सरकारच्या महागाईच्या धोरणांवर त्यांनी कडाडून टीका केली.राष्ट्रवादी महिला काँगेसच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले.