Saturday, September 21, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे नाताळ निम्मित किट वाटप...

राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे नाताळ निम्मित किट वाटप…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मा. आ जयंत पाटील साहेब, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज मध्ये नाताळनिमित्त फराळाचे किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला आघाडी च्या मिरज शहराध्यक्षा व संजय गांधी निराधार योजना मिरज शहर मा. अध्यक्षा सौ. वंदनाताई चंदनशिवे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात पास्टर स्वरूपदास लोंढे यांनी केली. यावेळी सर्वांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दिल्या.

यावेळी मिरज शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वंदनाताई चंदनशिवे , सांगली शहराध्यक्ष सौ. अनिता पांगम, सांगली शहर सरचिटणीस सौ. सुरेखा हेगडे, मिरज शहर उपाध्यक्ष सौ. रहिसा चिंचणीकर, मिरज शहर चिटणीस सौ. प्रिया लोंढे, मिरज शहर सरचिटणीस सौ. अनिता साळुंखे सौ. सुशीला वाघमारे सौ. प्रमिला मोहिते व चर्च महिला मंडळ आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: