रामटेक – राजु कापसे
मौदा शहरातील शिवाजी उच्च प्राथमिक शाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण जिल्ह्यात स्वराज्य सप्ताह कार्यक्रम राबविल्या जात आहे. त्याच अनुषंगाने मौदा येथील शिवाजी उच्च प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,व वकृत्व स्पर्धा,असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा )गुजर हे होते. अनेक विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेऊन छत्रपती शिवरायांचे व माता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने तालुका अध्यक्ष आशिष पाटील, संचालक कृ. ऊ. बाजार समिती पृथ्वीराज गुजर,युवक युवक अध्यक्ष दिनेश ठाकरे नागपूर जिल्हा मीडिया सेल अध्यक्ष दिलीप सानगडीकर नवेगाव उप सरपंच सागर शिंदे राजेश सोनकुसरे प्रमोद सानगडीकर मीनाक्षी कावळे शहराध्यक्ष संगीता जवंजाळकर साक्षी वर्मा अक्षय वाघाडे राज गोल्हार,विकास बावनगडे शुभम सोनवाणे, हर्षद ठक्कर साहेब शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर वासनिक जय देव आंबिल्डुके उज्वला नांदुरकर अजय वैद्य राधा मारबते वंजारी मॅडम व अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.