पातूर – निशांत गवई
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचे अपमानस्पद कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात पातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांचे मार्गदर्शनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष कृष्णभाऊ अंधारे, ओ.बी.सी सेल म.प्र सचिव मो.नजीब सेठ, अल्प.जिल्हाध्यक्ष नईम खान, डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा सरचिटणीस रामा अमानकर, तालुकाध्यक्ष गजानन पाटील,गणेश महल्ले, प्रमोद महल्ले,पातुर शहराध्यक्ष कमरुज्जमा खान, पातूर शहराध्यक्ष युवक आघाडी नातिक शेख,अन्सार पहेलवान, ईलयास अली,ख्वाजा वाजीद अली,मो.जाकिर, अनंत गावंडे, रामुभाऊ अंबुलकर, अंकुश अमानकर, शेख शफी, प्रेमदास राठोड, प्रतीक धाईत,जय अंधारे, उपस्थित होते.