रामटेक – राजु कापसे
रामटेक खेड हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक वाढ होण्यास मदत होते .तसेच खेळासाठी आपले जीवन समर्पण करणारे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त ताई गोळवलकर महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवना बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमांमध्ये IQAC चे कॉर्डिनेटर डॉ. विजय राऊत उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकइतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक क्रीडा प्रमुख डॉ. चंद्रमोहन सिंग यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये रस्साखेच ,धावण्याचे स्पर्धा, वूड बॉल या प्रकारचे खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच रस्सीखेच या स्पर्धेमध्ये मुलांच्या फायनल मॅच त्यामध्ये बीएससी द्वितीय वर्ष v/s बीएससी प्रथम वर्ष मधून फायनल द्वितीय वर्ष हे विजयी झाले तसेच बीएससी तृतीय वर्ष मुली विरुद्ध बीएससी द्वितीय वर्ष मुली यामध्ये बीएससी तृतीय वर्ष च्या विद्यार्थी जिंकल्या.१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये मुलींमधून प्रथम जागृती पंचभाई , द्वितीय मीनाक्षी दुरबुले, तृतीय पायल गलबले ह्या विद्यार्थिनी विजयी झाल्या व वूडबॉल या स्पर्धेमध्ये सर्वांमधून प्रथम जागृती पंचभाई, द्वितीय पायल गलबले, तृतीय तन्मय देशमुख हे विद्यार्थी विजयी झाले.