रामटेक – राजु कापसे
रामटेक येथील कविकुलगुरु इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (किट्स) च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) द्वारे हिवरा येथे १२ ते १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ६ दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यानी केले.
या वेळी अतिथी म्हणून डीन विद्यार्थी विकास डॉ. पंकज आष्टनकर, हिवरा (हिवरी) चे सरपंच सुनील गजभिये, उपसरपंच राकेश कुंभलकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उद्धल हटवार , जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सचिन चव्हान सहित विद्यार्थि उपस्थित होते. या ६ दिवसीय श्रमसंस्कार शिबिरा मध्ये ५० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहकार्याने श्रमदान व प्रबोधन केले.
स्वच्छता तसेच घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक मुक्त भारत, पाणी वाचवा पाणी जिरवा व मतदार जागृती या विषयावर रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये स्वयंसेवका सह शाळकरी मुलांचाही समावेश होता.शिबीरा दरम्यान हिवरा जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, गीत, नृत्य असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य तपासणी व योगा शिबिरा मध्ये ९० विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेतला. डॉ. भूमेश्वर नाटकर व डॉ. स्नेहल नाटकर यांनी तपासणी करून, आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले.यात औषधी चे मोफत वितरन करण्यात आले.डॉ बापू सेलोकर यांनी योगाचे जिवनातिल महत्व या विषयी माहीती दिली व योगा आसन करुन घेतले.
समारोप कार्यक्रमाला किट्स रामटेक चे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, संगणक विभाग प्रमुख डॉ.विलास महात्मे, डॉ पंकज आश्टनकर, प्रा.रसिका रेवतकर, प्रा कविता केने, माजी सरपंच दिलीप काठोके, शिक्षिका रुपाली चटक सहित आदि शिक्षक उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते मुलांना बक्षीस वितरित करण्यात आले.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की शिबिरामुळे समूहभावना वृद्धिंगत होऊन विद्यार्थ्यांना ग्रामीण लोकासोबत समरस होता येते. शिबिर यशस्वितेसाठी विद्यार्थी प्रतिनिधि सेजल चौरसिया, रिंकेश, जुबेर, अंकेश,अक्षय सहित इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.