Sunday, December 22, 2024
Homeखेळराष्ट्रीय व राज्य स्तरीय रग्बी खेळाडूंचा आमदारांच्या हस्ते सत्कार...

राष्ट्रीय व राज्य स्तरीय रग्बी खेळाडूंचा आमदारांच्या हस्ते सत्कार…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुका रग्बी असोसिएशन व रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रग्बी खेळात रामटेक तालुक्याचे व नागपूर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय रग्बी खेळाडूंचा सत्कार दि.२८ जानेवारी २०२४ ला आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.

६७ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा (१४ वर्षे वयोगट) खालील रग्बी चॅम्पियनशिप २०२३ करिता महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल व या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला तृतीय स्थान पटकावून देणारी कु.स्मृर्ती ईश्वर मलघाम रा.डोंगरताल,ता.रामटेक या खेळाडूचा विशेष सत्कार आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्पर्धा प्रमुख रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सचिव महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना डॉ.राकेश तिवारी,कोषाध्यक्ष रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर नेहाल डांगे,सहसचिव रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर अमर भंडारवार,सदस्य ज्युनिअर चेंबर ऑफ इंटनॅशनल नागपूरचे धर्मपाल फुलझले,अध्यक्ष ज्युनिअर चेंबर ऑफ इंटनॅशनल नागपूरच्या श्रीमती आदिती पॉल, ऋषिकेश किंमतकर,कु.योगिता बरडे,दिपक मडावी सह राग्बीचे संपूर्ण खेळाडू व प्रशिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: