सांगली – ज्योती मोरे
शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.अधिकराव पवार सर तसेच गांधीजींच्या (चरख्यासह) वेशभूषेत आलेले विद्यार्थी लहान गटातील वेदांत सांगोलकर व इयत्ता पाचवी मधील स्वराज जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सौ सुनीता पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार व कार्य याबद्दल माहिती दिली.
यावेळी पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या तीन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. परीक्षक म्हणून सौ. पूजा पाटील व सौ .अश्विनी जाधव होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीनी स्वछतेचे महत्व गाण्यातून सादर केले.
त्यानंतर शाळेतील सहा शिक्षिका सौ. ललिता गोंडाजे यांनी स्वच्छतेवर आधारित गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार कु. शुभांगी ढेरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.