Sunday, December 22, 2024
Homeराजकीयनाथ समाज संघाचा भाजपाचे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार रणजीत पाटील...

नाथ समाज संघाचा भाजपाचे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार रणजीत पाटील आणि नागो गाणार यांना जाहिर पाठींबा…

खामगाव – नाथ समाजाच्या उत्कर्षासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा तसेच प्रसंगी आंदोलन करुन समाजाला न्याय मिळवून देण्याचे विदर्भ स्तरीय वैदर्भिय नाथ समाज संघ ही नोंदणीकृत व संपूर्ण विदर्भात नाथ समाजाला एकजुट ठेवणारी संघटना वजा संस्था असून सदर संघटनेच्या वतीने दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी अमरावती येथील परिणय बंध सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजीत पदवीधर मतदार मेळाव्यामध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भाजपाचे पश्चिम विदर्भ संयोजक मा. श्री. शामभाऊ पाध्ये यांच्या समन्वयातून अमरावती पदविधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार मा. श्री. रणजीत पाटील व नागपुर विभागीय शिक्षक मतदार संघाचे भाजपा समर्थीत उमेदवार श्री. नागो गाणार यांना जाहीर पाठींब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री मा. श्री. संजय कुटे, माजी आमदार श्री. चैनसुख संचेती हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन पर भाषणात मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वैदर्भिय नाथ समाज संघाने दिलेल्या जाहीर पाठींब्याबद्दल विशेष आभार मानले.

भाजपाचा नाथसमाजाप्रती असलेल्ल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे सदर पाठींबा दिल्याचे यावेळी सांगीतले. पत्र देते वेळी वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. एकनाथ पवार, भाजपा शहर अध्यक्ष श्री. किरण पातुरकर, प्रदेश भाजपा प्रवक्ते श्री. शिवराय कुलकर्णी, भाजपाचे पश्चिम विदर्भ संयोजक श्री. शामभाऊ पाध्ये, प्रदेश भाजपा उद्योग आघाडीचे विवेक चुटके,

ओबीसी शहर अध्यक्ष भाजपा छोटू वानखडे, विशाल डहाके तसेच वैदर्भिय नाथ समाज संघाचे मुख्य मार्गदर्शक श्री. दिवाकरनाथजी गौरकर, पदाधिकारी श्री. शामभाऊ गोदडे, अनुप कंखर, नितीन आखतकर, रवि इंगळे, अवीनाश इंगळे,रोहण तिहिले,गोपाल अवगन, अभिषेक पाठक, प्रशांत उबाळे, विजय जवंजाळ आदी नाथ बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: