हेमंत जाधव
आज अकोला जिल्हातील पुंडा येथे नाथ समाजाचा मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्याचे आयोजन वैदर्भीय नाथ समाज संघ च्या वतीने केले होते. या कार्यक्रमाच्या मुख्य स्थानी आमदार अमोल मिटकरी होते तर समाजातील मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली तसेच समाजाच्या विकास कामांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम याशीस्वीरित्या पार पाडण्यासाठी समाजातील व्यक्तींनी विशेष परिश्रम घेतले त्यांचा मानसन्मान सुद्धा करण्यात आला. अविनाश इंगळे हे समाज कार्यात सदैव अग्रेसर असतात व कार्यतत्परतेने समाजकार्य करतात म्हणून त्यांना आमदार अमोल मिटकरी यांचे हस्ते “नाथसमाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.