Sunday, December 22, 2024
Homeराज्यनाथ समाजाची राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी...

नाथ समाजाची राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी…

अकोला – हेमंत जाधव

अकोला येथे वैदर्भीय नाथ समाजाकडून राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी करण्यात आली, नाथ समाज हा मागासलेला आहे समाजाच्या मागण्या करीता राज्यभरात विविध आंदोलने करण्यात आली पण त्यांना राज्यसरकार कडून दुर्लक्षित करण्यात आले, श्री मच्छिंद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाची मागणी ही नाथ समाजाकडून करण्यात आली आहे,

इतर समाजासाठी वेगवेगळ्या महामंडळाची स्थापना करण्यात आली पण नाथ समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे, एक तर श्री मच्छिंद्रनाथ आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्याचे आदेश राज्यपालांनी सरकारला द्यावे किंवा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी या आशयाचे निवेदन वैदर्भीय नाथ समाजाकडून राज्यपालांकडे अकोला जिल्हाध्यक्ष यांचे माध्यमातून पाठवण्यात आले. या वेळी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: