Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayनाशिक । खाजगी बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात...१३ जणांचा जळून...

नाशिक । खाजगी बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात…१३ जणांचा जळून मृत्यू…

नाशिक –यवतमाळ येथून काल दुपारी निघालेल्या खाजगी बसचा औरंगाबाद रस्त्यावर आज शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला-अपघातानंतर बस पेटल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली असून यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे.

डंपर आणि खाजगी बसचा अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाड झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये २० ते २५ प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.

आज दि. 08/10/2022 रोजी पहाटे नाशिक शहरामध्ये ट्रेलर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे सदर ट्रॅव्हल क्रमांक MH 29 AW 3100 ही काल दिनांक 7/10/22 रोजी दुपारी 3.30 वाजता यवतमाळ वरुन मुंबईसाठी निघाली होती ह्या ट्रॅव्हलमधे प्रवास करीत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाश्यांच्या बाबत माहिती देण्यासाठी व माहिती घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
07232-240720
8668784847
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: