Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayनरखेड । पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा...

नरखेड । पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा…

सामाजिक कार्यकर्ता राजेश श्रीरसागर याच्याकडुन नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था भेट

नरखेड – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे वतीने नरखेड शहरात सेवा पंधरवाडा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिक रत्नकारजी वघाळे, अशोक दुर्गे यांचे हस्ते केक कापून तसेच आसन व्यवस्था लोकार्पण गणपती टेकाडे, विनायकजी रेवतकर व वसंतराव कोरडे यांचे हस्ते करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

नरखेड शहरात विविध देवस्थान आणि सार्वजनिक ठिकाणी परिसरातील नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था भेट देण्यात आली. पेठ विभागातील भवानी माता मंदिर, खारी वॉर्डातील हनुमान मंदिर, महादेव मंदिर, सिनेमा टॉकीज चौक आदी ठिकाणी बेंचेस बसविण्यात आले.

याप्रसंगी श्यामराव बारई, मनोज कोरडे, प्रशांत खुरसंगे, प्रमोद वैद्य,मनिष दुर्गे, अशोक कळंबे, राजेश क्षिरसागर, शरद मदनकर, अनिल अलोने,दीपक बेहरे, विजय वैद्य, सतिश टेकाडे,सुनिल सोनटक्के, लीलाधर रेवतकर,कैलास रेवतकर,वासुदेव कळंबे,बाळाभाऊ चरडे,सिताराम कठाने,महादेव कठाने,प्रशांत शेंडे,राजू कटारे, भागवत दुर्गे, नंदू कटारे,भगवान कटारे, गणेश कोरडे, भागवत देवतळे,दिलीप डांगर, देवेंद्र रेवतकर यांचेसह परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: