नरखेड–15
नरखेड पंचायत समिती च्या आज झालेल्या सभापती व उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे महेंद्र गजबे यांची अविरोध निवड झाली तर उपसभापती पदी माया मुढोरिया यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे स्वप्नील नागापुरे यांच्यावर सहा विरुद्ध दोन अश्या मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस चे सुभाष पाटील यांना शून्य मत मिळाले.
सभापती पद अनुसूचित जमाती करिता राखीव असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र गजबे यांची निवड आरक्षण जाहीर होताच निश्चित झाली होती. ते अनुसूचित जमातीकरिता राखीव खरसोली पंचायत समिती गणातून निवडून आले होते. उपसभापती पदाकरिता राष्ट्रवादीचे पाचही सदस्य इच्छुक होते परंतु शेवटी माया मुढोरिया याना संधी मिळाली. भाजप कडून स्वप्नील नागापूरे हेही मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीचे सुभाष पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत उपसभापती पदाकरिता नामांकन दाखल केले होते. त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे काहीवेळ राष्ट्रवादी च्या गोटात चिंतेचे वातावरण होते.
सभापती पद अनुसूचित जमाती करिता राखीव असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र गजबे यांची अविरोध निवड झाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीत हात उंचावून मतदान करायचे होते. भाजपच्या स्वप्नील नागापूरे याना भाजपची दोन मते मिळाली . माया मुढोरिया यांच्याकरिता सुरवातीला पाच व सर्वात शेवटी उमेदवार सुभाष पाटील यांनीसुद्धा हात उंचावून मतदान केले. त्यामुळे माया मुढोरिया याना सहा मते व सुभाष पाटील यांना शून्य मत मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा सतीश शिंदे यांनी तर भाजपची धुरा उकेश चौहान यांनी सांभाळली. निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी गटाकडून हर्षउल्हास साजरा केला. सतीश शिंदे, शिवसेनेचे राजू हरणे , नरेश अरसडे, सतीश रेवतकर, वसंत चांडक ,नंदलाल मोवाडे, मनीष फुके, दीपक मोहिते, प्रवीण जोध, अमोल आरघोडे , अनिल गोतमारे, अतुल पेठे , संजय चरडे , नीलिमा रेवतकर , अरुणा मोवाडे, नीलिमा अरसडे व शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.