नरखेड – निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेचा नववा वार्षिकोत्सव दिनांक 6 फेब्रुवारी 2023 सोमवारला निरामय केंद्र, सायकी, तालुका उमरेड येथे साजरा करण्यात आला. ही संस्था गेल्या 9 वर्षापासुन, स्वास्थ्य, शिक्षण स्वावलंबन आणि संस्कार च्या माध्यमातून पन्नास गावांमध्ये ग्राम विकासाचे कार्य करीत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून सौ. कांचनताई गडकरी, कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजुभाऊ पारवे, (आमदार, उमरेड तालुका) श्री प्रियेश महाजन,( तहसीलदार, उमरेड) श्री ताशी जी (जनरल सेक्रेटरी अथेलिट असोसिएशन लेह लडाख) सौ. सुषमा ताई शास्त्री इन्फोसिस आयटी कंपनी चे श्री जयंत देशकर, नितेश मंदारा, शिव सोनी,भाग्येश काळे आणि सौ मायाताई धोपटे सरपंच सायकी गाव उपस्थीत होत्या. जवळपास 40 गावातून जवळपास 1000 लोक (महिला, शेतकरी, युवक आणि काही मुलं) स्व खरच्याने या कार्यक्रमात आले ही या कार्यक्रमाची विशेषता.
निरामय केंद्रात असलेल्या भारत मातेच्या प्रतिमेचा पूजन करून सर्वप्रथम रानभाजी महोत्सव च्या अंतर्गत रान भाजी पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. सुषमा ताई शास्त्री आणि सौ सरिता ताई अग्रवाल होत्या. ही रानभाजी पाककला स्पर्धा 3 निकषांवर वर आधारित होती. सादरीकरण, रान भाजी बद्दलची माहिती, आणि रान भाजीची चव. ही रानभाजी स्पर्धा उत्तम पद्धतीने पार पडली.
या कार्यक्रमात एकूण 26 गावातून 47 स्पर्धकांनी भाग घेतला. 40 प्रकारच्या विविध रानभाज्या स्टॉल वर सजवल्या होत्या. सोबतच कृषी विभाग, एमगिरी, ग्रामोत्थान आणि प्रवास नावाच्या महिला बचत गटाचे लोंच्याचे स्टॉल होते. सौ. सुषमा शास्त्री यांनी कार्यक्रमात आलेल्या लोकांना रान भाजीचे महत्व सांगून, रोजच्या आहारात रानभाजी वापरली गेली पाहिजे त्याचे महत्व सांगितले.
या कार्यक्रमात संस्थे द्वारे ग्रामीण भागात चालणाऱ्या अभ्यास वर्गाच्या मुलांनी, देशभक्ती पर गीत, नृत्य, योग आणि शेतकऱ्यांची स्थितीचे वर्णन, पथनाट्याच्या माध्यमातून सांगून उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे संचालन संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती वर्षाताई जोशी यांनी केले.
या कार्यक्रमात कृषी आणि कृषी पूरक उद्योग धंद्यांवर एम गिरी च्या वैज्ञानिक श्री जय किशोर छांगाणी यांचे महत्वाचे मार्गदर्शन प्राप्त झाले. त्यांनी सांगितले की ग्रामीण उद्योगांना प्रोहोत्सहान देण्याकरिता एम गिरी कश्या पद्धतीने काम करते. कोण कोणते प्रशिक्षण देते आणि ग्रामीण बचत गटातील महिला थोडे प्रशिक्षण घेऊन, कोणकोणते उद्योग ग्रामीण भागात लाऊ शकतात या वर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.
उमरेड येथील तहसीलदार श्री प्रियेश महाजन यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालक वर्गाला सांगितले की मुलांना मोबाईल च्या आहारी जाऊ देऊ नका, ते मोबाईल वर काय बघतात आहे या वर आपले लक्ष असायला पाहिजे आज पालकांचा जागृत राहणे खूप आवश्यक आहे. कारण मोबाईल मुळे जितके फायदे आहे तितकेच नुकसान पण पाहायला दिसते आहे.
लेह लडाख वरून आलेले पाहुणे श्री ताशी जीनीं लोकांना सांगितले की “आम्ही लोक किती विपरीत परिस्थितीत काम करतो, बर्फ बारी मुळे सहा सहा महिने आमचा संपर्क जगाशी तुटतो. इतक्या विपरीत सुध्दा आमचा शेतकरी हिम्मत नाही सोडत. कृपया तुम्ही लोकांनी पण हिम्मत सोडू नये.” असे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमात इन्फोसिस कंपनी च्या माध्यमातून संस्थे द्वारे चालणाऱ्या अभ्यास वर्गाच्या मुलांसाठी १०० टॅब देण्यात आले. इन्फोसिस कंपनीकडून आलेले पाहुणे श्री जयंत देशकर सांगितले की या टॅब च्या माध्यमातून मुलांना शिक्षणाबद्दल गोडी तयार होईल.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रानभाजी पाककले स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक कन्हाळगाव महिला गटाला मिळाले. द्वितीय क्रमांक सुकळी गावातील सौ. वर्षा शेंडे यांना मिळाले आणि तृतीय क्रमांक वर्धमान नगर बुटीबोरी येथील यशस्वी महिला बचत गट या गटाला मिळाला.
या सोबतच निरामाच्या माध्यमातून गावोगावी चालणाऱ्या अभ्यास वर्गांच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक महिन्यात एक उत्तम शिक्षक निवडला जातो आणि वर्षभरातून जास्त वेळा जी शिक्षिका निवळली जाते तिचा वार्षिक उत्तम शिक्षक म्हणून सत्कार केला जातो. यावर्षी कु. शिवानी हजारे परसोडी हळदगाव आणि कु. अंजली दूधकवर धूटी गाव या दोन्ही शिक्षिकांचा सत्कार आदरणीय कांचनताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या सचिव डॉक्टर उर्मिलाताई क्षीरसागर यांनी सायकी येथे सुरू असलेल्या निरामय केंद्र प्रकल्पाची माहिती दिली आणि भविष्यातील योजनांबद्दल पाहुण्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री राजूभाऊ पारवे यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जनतेला मार्गदर्शन केलं सोबतच ते म्हणाले की माझ्या विधानसभा क्षेत्रात इतक्या आतील गावांमध्ये लोकांसाठी काम करणारी ही संस्था आहे याचा मला अभिमान आहे आणि या संस्थेला जिथे कुठे माझी गरज असेल ती मी नक्की पूर्ण करेल असा आश्वासन आणि शुभेच्छा राजू भाऊ यांनी संस्थेला दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आदरणीय कांचन ताई गडकरींनी यांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मातृशक्तींना संबोधून म्हणाले की “घरातील माता जर सशक्त असेल तेव्हाच कुटुंब आणि समाज मजबूत होईल आणि आपली भारत माता पण मजबूत होईल. त्या त्यामुळे मातेचे जे मुलाप्रतीचे कर्तव्य आहे ते समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण माता ही घर, समाज आणि देश घडवत असते.” सोबतच संस्थेच्या या रानभाजी महोत्सव आणि रानभाजी पाककले स्पर्धेचा केलेल्या निरीक्षणाच्या बद्दल पण त्यांनी आपले मत मांडले की रान भाजीची गरज आज सर्वांना आहे ह्या बद्दल अधिक जाणीव जागृती व्हायला हवी त्यांनी निरामय संस्थेला नागपूर शहरात सुध्दा असे आयोजन करण्याचे आव्हान केले. आणि ग्रामीण भागात केलेल्या या आयोजांबद्दल संस्थेचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिले.
मुख्य कार्यक्रमाचे संचालन करून, संस्थेच्यामाध्यमातून ग्रामीण भागात चालणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती संस्थेच्या अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांनी दिली. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शिरसागर यांनी केले.