Monday, December 23, 2024
Homeराज्यनरखेड । राष्ट्रवादीचे महेंद्र गजबे होणार सभापती, उपसभापती करिता चुरस…

नरखेड । राष्ट्रवादीचे महेंद्र गजबे होणार सभापती, उपसभापती करिता चुरस…

नरखेड

राजकारणात कुणाला कधी व कशी संधी मिळेल हे सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती नरखेड चे सदस्य महेंद्र गजबे याना अशीच संधी चालून आली. पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जमाती करिता राखीव झाली. राष्ट्रवादी काँग्रेस चे महेंद्र गजबे हे एकमेव सदस्य या प्रवर्गातून असल्यामुळे ते सभापती पदी १५ ऑक्टोबर ला आरूढ होतील हे निश्चित झाले आहे. उपसभापती पदाकरिता उमेदवार निवड करताना रस्सीखेच असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. असे सध्याचे चित्र आहे.

सभापतीपदा करिता उमेदवार देताना राष्ट्रवादी काँग्रेस समोर पेच निर्माण होईल अशी परिस्थिती होती. पक्षांतर्गत मतभेद व वर्चस्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती सदस्यांमध्ये सरळ सरळ दोन गट पडल्याचे चित्र आहे. परंतु आरक्षण सोडती मध्ये नरखेड पंचायत समिती सभापती पद हे अनुसूचित जमाती करिता राखीव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नि सुटकेचा निश्वास सोडला. उपसभापती पदाचा उमेदवार निवडताना मात्र राष्ट्रवादि काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे. राष्ट्रवादीचे इतर पाचही सदस्य उपसभापती पदाच्या शर्यतीत आहेत.

आठ सदस्य संख्या असलेल्या नरखेड पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडे सहा तर भारतीय जनता पक्षाकडे दोन सदस्य असे संख्याबळ आहे. मार्च २०१९ मध्ये झालेल्या पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने मोठे यश मिळवून आठही जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन सदस्य अपात्र झालेत. त्या दोन्ही जागा जुलै २०२१ च्या पोटनिवडणुकीत भाजप नि काबीज केल्या. नोव्हेंबर २०२१ मध्ये उपसभापती निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या भाजपचे स्वप्नील नागापूरे अविरोध निवडून आले होते.

सभापतीपदी पुरुष आरूढ होत असल्यामुळे उपसभापती पदी महिला उमेदवाराची निवड होईल असे संकेत जाणकारांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडे विद्यमान सभापती नीलिमा रेवतकर, अरुणा मोवाडे व माया मुरोडिया या तीन महिला सदस्य आहेत. अंतर्गत गटबाजीमूळे अरुणा मोवाडे व माया मुरोडिया यांच्या पैकी उपसभापती कोण होईल हे येणारा वेळच सांगेल. अटीतटीच्या परिस्थितीत विद्यमान सभापती नीलिमा रेवतकर याही उपसभापती होऊ शकतात. नोव्हेंबर २०२१ मध्ये उपसभापती पदाचे नामनिर्देशन भरताना वेळ निघून गेल्यामुळे आलेली संधी गमावलेले मयूर उमरकर व सुभाष पाटील हेही शर्यतीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: