नरखेड–24
नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथील अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ साधना जिचकार मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा.प्रवीण वसू सर तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा आशिष काटे सर मंचावर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रा. काटे सरांनी राष्ट्रीय सेवा योजनाची सुरुवात केव्हा झाली, कोणी केली व कशाकरीता केली हे सागितले राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश स्पष्ट केला तर अध्यक्षिय भाषणामधे डॉ जिचकार यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाच्या इतिहास सांगितला, आणि मुलांना मार्गदर्शन केले.वरील कार्यक्रमाला डॉ रीता डंभाळे मॅडम, डॉ अंजली घारपुरे मॅडम ,प्रा. मानसी जोशी ,डॉ अविनाश इंगोले सर, डॉ राम डोंगरे सर , प्रा.सुरेंद्र सिनकर सर, प्रा. महेश्वरी कोकाटे मॅडम , प्रा.आरती पावडे मॅडम प्रा.अजय मंगल ,प्रा. चिंचमालातपुरे सर, प्रा.भूषण खोडे सर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.आशिष काटे सर यांनी केले तर आभार डॉ. अमित गद्रे सर यांनी मानले.