नरखेड – मिलिंद खोंड
महादेवराव राऊत कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,उमरी(सिंदी) त. नरखेड येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.भु.म. मुटे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ऑक्टो.२०२१ मध्ये यू ट्युब वर मायबोली कट्टा नावाचे चॅनेल सुरू केले.
पुढे या चॅनेल च्या माध्यमातून त्यांनी बौद्धिक, तांत्रिक,धार्मिक व आध्यत्मिक प्रबोधन सुरू केले. अवघ्या दीड वर्षाच्या काळात मायबोली कट्टा या युट्युब चॅनलने एक लाख सबस्क्राईबर चा टप्पा पूर्ण करून नागपूर ग्रामीण भागातून पहिला मान मिळविला. या अत्युच्च कामगिरी बद्द्ल युट्युब ने सिल्व्हर प्ले बटण ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केले.आजमितीस या चॅनेल चे 1,26,000 सबस्क्राईबर आहेत.
या निमित्ताने काटोल नगर परिषद चे मा.नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.चरणभाऊ ठाकूर यांनी सरस्वती नगर मधील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रा.बी.एम.मुटे व सौ. शुभांगी मुटे यांचा सपत्नीक सत्कार केला.
याप्रसंगी ॲड.दीपक केणे,विनोद नागपुरे,अशोक काळे,वनिता रेवतकर,आशिष शेंडे,अजय केचे,धनराज बोरकुटे,कृष्णा गवळी,प्रभाकर बालपांडे,नंदा पोहणे,सविता बोरकुटे, वैशाली शेंडे,पाटील ताई,श्रेया मुटे, प्रवीण जैन,चंद्रभान पाटील, अभिनव शेंडे, शुभम मुटे, मनोज सांभारे, गुड्डू शेख, जयेश वाघ , शाकिर शेख, विशाल बिघाणे, प्रदीप झरगर, आराध्य शेंडे श्री.अतुल सरोदे, गजेंद्र वाघ, रुपेश नेरकर,अमोल येलेकर, सुशील ठोंबरे, ज्ञानेश्वर रेवतकर,सूरज घोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.