Monday, December 23, 2024
Homeराजकीयआमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने नारी शक्तीस नवदुर्गा पुरस्कार सन्मान :...

आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने नारी शक्तीस नवदुर्गा पुरस्कार सन्मान : आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने उपक्रम…

सांगली – ज्योती मोरे

स्त्रियांच्या कार्यक्षमतेवर एकेकाळी समाजाने लावलेले प्रश्नचिन्ह कर्तुत्वान स्त्रियांच्या कर्तृत्वाने पुसून टाकले आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या आणि कर्तुत्वाच्या सर्व रूपातील नारीशक्तीच्या कार्याला सलाम करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने हॉटेल ककून येथे पुरस्काराचे औचित्य साधून पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह इत्यादी देऊन आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांच्या यशस्वी कार्याचा सन्मान आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच तर्फे करण्यात आला.

यावेळी विविध क्षेत्रातील ११ महिलांचा सन्मानपूर्वक सत्कार आमदार सुधीरदादा गाडगीळ व इतर सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते करून करून त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा उमटविलेला ठसा व्हिडीओ क्लिप द्वारे स्क्रीन वर दाखविण्यात आला. व नवदुर्गा पुरस्कार २०२३-२४ चा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सौ. अनुराधा सुरेश गोखले – जन कल्याण समिती तर्फे ४ हॅास्पीटलमध्ये सुरू असलेल्या अन्नपूर्णा योजनेची प्रमुख म्हणून दायित्व आहे.

पूजा तेंडुलकर महाविद्यालयातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवीधर आणि पर्यावरण विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेऊन उत्तर भारतात सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन यावर काम केले आहे. त्यांनी गेल्या ६ वर्षात, भारतभरातील १०० पेक्षा अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गोष्टी, पाणी व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर लेक्चर देऊन जागरूक केले आहे. डॉ शिल्पा दाते gynecologist असून (स्त्री आरोग्य तज्ञ) जोखमीच्या प्रसुती, कर्करोगा पासून बचाव, कर्करोगा विषयी जागरूकता, दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया यामध्ये पारंगत आहेत सांगली जिल्हा तील पहिली महिला Ironman, पहिली महिला Comrades finisher आहे.

सौ. प्रियांका राजेश देवर्षी या महिला समुपदेशक आहेत त्यांनी आजपर्यंत जवळपास साडेचार हजार महिलांचे समुपदेशन करून शेकडो कुटुंब विघटित होण्यापासून त्यांनी सावरले आहेत. शाहीर कल्पनाताई माळी या 2011 साली झी मराठीच्या मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात सहभागी होऊन विजेते ठरल्या होत्या. त्यानंतर अशा अनेक वाहिन्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सह्याद्री वाहिनीवर महिला ताल यात्रा, धिना धिन धा, या कार्यक्रमातही सहभाग घेतला.

तसेच अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. सौ सुनीता भाऊसो भोसले भाजी विक्रेत्या असून पतीने मुले लहान असतानाच दुसरा विवाह केला व त्या परिस्थितीत न खचता स्वतःचा भाजीपाला व्यवसाय त्यांनी सुरू केला. या व्यवसायावरच मुलीला इंजिनिअर केले सध्या त्यांच्याकडे मातोश्री महिला भाजीपाला मंडळाचे खजिनदार पद आहे. प्रबोधिनी उर्फ स्वाती चिखलीकर देशातील नंबर 1 चॅनेल आजतक या हिंदी न्युज चॅनेलचे 2000 सालापासून सांगली जिल्हा प्रतिनिधी, आणि 2017 पासून मुंबईतक या अल्पावधीतच महाराष्ट्र भर प्रसिद्ध झालेल्या मराठी चॅनेलची सांगली जिल्हा प्रतिनिधी आहेत.

सौ सविता संजय कुंभार या जय महाराष्ट्र कामगार युनियन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. संघटित व असंघटित कामगारांच्या समस्या सोडवून त्यांना संघटीत करणे महिलांना रोजगार निर्मिती व कामात सहकार्य करणेचे कार्य त्या करतात. मंगल अरविंद कदम (गृहिणी शिलाई व्यवसाय) पतीचे निधन झाले. तेव्हा तिन हि मुले जेम तें १० वी ८ वी मध्ये शिकत होते व छोटा मुलगा अवघ्या ४ वर्षांचा होता.

शिवणकाम करून त्यांनी तिन्ही मुलांना आज वेल सेट केले असून ते आज मल्टी national कंपनी मध्ये भारत व भारताबाहेर नोकरी करत असून त्यांचा मोठा मुलगा मुंबई, मधला मुलगा सिंगापूर येथे व छोटा मुलगा पुणे येथे नोकरी करत आहेत. साहिरा खालील जमादार तरी स्वतःच्या कर्तुत्वावर सुरुवात करण्यासाठी या गेली 29 वर्षे बिल्डिंग मटेरियल साठी लागणारे स्टील चा व्यवसाय करत आहे.

त्यांचा १ मुलगा दुबई मध्ये नोकरीस आहे व दुसरा मुलगा सांगली येथे शिक्षण घेत आहे शुभांगी कुलकर्णी : (जनरल मॅनेजर) त्यांनी सांगली येथे त्यांच्या संघर्षाला सुरुवात केली. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय व औपचारिक शिक्षणाशिवाय त्या आता कितीतरी कर्मचार्यांचे त्या दायित्व करत आहे. व एका नामांकित संस्थेचा भाग असून त्यांचा महिलांना सबळ व सक्षम बनविण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी (कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्य) तर्फे त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अशा या विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी प्रेरित करण्याचा छोटासा प्रयत्न आमदार सुधीर दादा गाडगीळ युवा मंच च्या वतीने आज करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, अजिंकीयन फाउंडेशन च्या संस्थापिका मंजिरी गाडगीळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य नीता केळकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, सांगली शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे-पाटील , प्रदेश कार्यकारणी सदस्य भारती दिगडे, माजी महापौर संगीता खोत, माजी महापौर गीता सुतार,

शहर जिल्हा सरचिटणीस गीता पवार, माजी नगरसेविका सविता मदने, उर्मिला बेलवलकर, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, अप्सरा वायदंडे, माधुरी वसगडेकर, शोभा बिक्कड, हेमलता मोरे, वैशाली पडळकर, कोमल चव्हाण, आश्विनी तारळेकर, प्रीती काळे, रिटा शहा, स्मिता घेवारे, छाया हाक्के, गंगा तिडके, अतुल माने,

जिल्हा सरचिटणीस राजेश आवटी, अविनाश मोहिते, उदय मुळे, निलेश निकम, अमित देसाई, चेतन माडगूळकर, दरीबा बंडगर, अविनाश मोहिते, अनिकेत बेळगावे, अशोक गोसावी, व पुरस्कार प्राप्त महिलांचे कुटुंबातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व स्वागत युवा मंचचे अध्यक्ष विश्वजित पाटील व आभार निमंत्रित सदस्य अश्रफ वांकर तसेच सूत्रसंचालन नेहा दातार यांनी केले..

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: