Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यनरखेड येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रम...

नरखेड येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रम…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्व माता-भगिनींशी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

या भाषणात मोदीजींनी लोककल्याणकारी योजनांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले असल्याचे सांगत विविध योजनांबद्दल माहिती दिली.

हा कार्यक्रम आपल्या नरखेड शहरांतील महिलांना लाईव्ह पाहता यावा महात्मा सांस्कृतिक सभागृह नरखेड येथे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. याप्रसंगी काटोल नरखेड विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर, माजी आमदार आशिष देशमुख, नगर विकास आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज कोरडे, काटोल विधानसभा सहप्रमुख शामराव बारई,

भाजपा अध्यक्ष राजेश क्षिरसागर, मनीष दुर्गे, संजय कामडे, प्रमोद वघाळे, सारंग दळवी, रमेश क्षिरसागर, गुणवंत बांदरे, सुनील सोनटक्के, शरद शेंदरे, छाया खुरसंगे, दिप्ती वघाळे, गीतांजली कोरडे, कविता शेंदरे, वैजयंती देशमुख,

संगीता बरगट, वर्षा कटारे, प्रीती कोरडे, कविता रेवतकर, कविता उईके, रुपाली नाहरकर, सुरज झाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सीमा कामडे, संचालन महिला आघाडी अध्यक्षा डॉ माधुरी बांदरे तर आभार उज्वला वघाळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना मदनकर, वैशाली चापेकर, दीपाली कामडे, कांचन वंजारी, प्रमिला वानोडे, ममता गौरखेडे, नलिनी धकीते, सीमा सरोदे, गीता अंतुरकर, नीलिमा सरोदे, स्वाती टेकाडे, रोशनी काळकर, शुभांगी पवार, कीर्ती काळबांडे,किरण ढोके,

मोना साखरवार व अनेक महिलां भगिनींनी परिश्रम घेतले. स्त्रीशक्तीला वंदन करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नरखेड नगरीतील हजारो माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: