- ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये खदखदत होता रोष
- नरेंद्र बंधाटेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन; बंधाटेच अध्यक्षपदी कायम
रामटेक – राजु कापसे
भारतीय जनता पार्टी रामटेक मंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र बंधाटेच आहेत अशी माहिती भाजपा नागपूर जिल्ह्याचे सचिव अनिल कोल्हे यांनी काल ५ ऑगस्टला रात्री रामटेक येथील हॉटेल दिप येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. चार दिवसांपूर्वी रामटेक येथील किराड भवन येथे आयोजित भाजपाच्या कमी संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ज्ञानेश्वर ढोक यांना रामटेक तालुका भाजपा अध्यक्षपदी नेमण्यात आले होते व त्यामुळे भाजपा रामटेक मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रोष उफाळला होता हे येथे विशेष.
ज्ञानेश्वर ढोक यांची नियुक्ती भाजपा रामटेक तालुक्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता वरिष्ठांना भूलथापा देऊन करण्यात आली होती. त्यामुळे ती नियुक्ती कुणालाच मान्य नव्हती.ज्ञानेश्वर ढोक यांना आमचा विरोध नाही.मात्र ग्रामीण पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांना न विचारता ती नियुक्ती करण्यात आली होती.त्यामुळे भाजपाच्या पदाधिकार्यांनी संघटन मंत्री यांना भेटून याबाबतीतली वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.
यानंतर वरिष्ठांनी ज्ञानेश्वर ढोक यांची नियुक्ती रद्द करून पुन्हा नरेंद्र बंधाटे यांनाच रामटेक तालुका भाजपा अध्यक्षपदी कायम ठेवले आहे. त्यामुळे नरेंद्र बंधाटेच रामटेक भाजपाच्या तालुका अध्यक्षपदी विराजमान आहेत असे अनिल कोल्हे म्हणाले. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नरेंद्र बंधाटे यांनी रामटेक तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून काल दि. ६ ऑगस्ट ला होटल दिप येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नरेंद्र बंधाटे यांच्यासोबत असून रामटेक तालुका भाजपा अध्यक्ष म्हणून नरेंद्र बंधाटेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मंजूर आहेत हे सिद्ध झाले. पत्रपरिषदेला रामटेक भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र बंधाटे, भाजपा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बालचंद बहादुले, भाजपाचे नागपूर जिल्हा सचिव अनिल कोल्हे, रामटेक भाजपा तालुका महामंत्री चरणसिंग यादव, महामंत्री राजेश जयस्वाल,
रामटेक मंडळ उपाध्यक्ष किशोर रहांगडाले,देवलापार मंडळ ओबीसी आघाडीचे अध्यक्ष देविदास दिवटे, अनुसूचित जाती आघाडीचे रामटेक मंडळ अध्यक्ष राजू रामटेके,ओबीसी आघाडीचे रामटेक मंडळ अध्यक्ष दिगंबर वैद्य,किसान आघाडीचे महामंत्री प्रकाश मोहारे,अनुसूचित जाती आघाडीचे महामंत्री आकाश वानखेडे,युवा आघाडीचे महामंत्री सचिन यादव,जेष्ठ आघाडीचे अध्यक्ष नामदेव तांडेकर,मुकेश शेंडे,हिमांशू जयस्वाल,नंदाबाई,कामगार आघाडी अध्यक्ष पप्पू यादव,
महिला आघाडी अध्यक्षा अनिता दियेवार, अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष रामानंद अडामे, महामंत्री बैजू खरे,वैद्यकीय आघाडी अध्यक्ष अनिल गजभिये, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष अन्सारी, किसान आघाडी अध्यक्ष चंद्रभान धोटे, गोपी कोल्हेपरा, अमृत जवंजाळकर आदी भाजपा पदाधिकारी,अनेक महामंत्री बुथप्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख आणि शेकडोंच्या संख्येने भाजपा महिला- पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत घराघरात झेंडा लावण्याचे आवाहनही उपस्थित मान्यवरांकडुन करण्यात आले होते.