महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या आदेशानुसार 18 ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी
या नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी व त्यांच्या पत्नी दिपाली मोतीयळे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांना शासनाने उपजिल्हाधिकारी पदावरून अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती दिली.सदरील आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे सह सचिव डॉ.माधव वीर यांनी काढले आहेत.या आदेशात महाराष्ट्रातील विविध जाती प्रवर्गातील 45 उपजिल्हाधिकारी यांना अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.