Tuesday, November 5, 2024
Homeकृषीशेतातील पिकामुळे व बँकेच्या कर्जामुळे विषारी औषध पिवून शेतकऱ्याची आत्महत्या!...किनवट तालुक्यातील घटना

शेतातील पिकामुळे व बँकेच्या कर्जामुळे विषारी औषध पिवून शेतकऱ्याची आत्महत्या!…किनवट तालुक्यातील घटना

महेंद्र गायकवाड
नांदेड

किनवट तालुक्यातील जमुनानगर येथील शेतकरी जयसिंग मानसींग आडे वय 60 वर्षे यांनी शेतातील पिक बरोबर नसल्याने व बँकेचे कर्ज असल्याने ते परतफेड करणे शक्य नसल्या कारणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिनांक 18 ऑगस्ट रोजी 07.00 वा. चे सुमारास यातील मयत नामे जयसिंग मानसींग आडे, वय 60 वर्षे, रा. जमुनानगर ता. किनवट जि. नांदेड, हे शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता शेतातील कापसाची परिस्थिती बघुन आणि शेतातील कापुस चिबडल्यामुळे तसेच कापसाचे पिक बरोबर नसल्याने एसबीआय बँकेच कर्ज व इतर कर्ज असल्यामुळे कर्ज कसे परतफेड करायचे म्हणुन काळजीने कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

सुभाष उध्दव आडे, वय 42 वर्षे, व्यवसाय शेती रा. जमुनानगर ता. किनवट जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे मांडवी आ. मृ. 13 / 2022 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पुढील तपास पोउपनि श्री कराळे, हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: