नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाचे सहा. मोटार वाहन निरीक्षक भूषण जवाहर राठोड वय (34) यास प्रशिक्षणार्थी चालकांना पास करण्याच्या मोबदल्यात नऊ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी राठोड यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हादाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे की,या घटनेतील तक्रारदार हा श्री.गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे ऑफिस बॉय म्हणून कामास आहेत.सदर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते. या सर्व फेल झालेल्या चालकांना पास करण्याच्या मोबदल्यात भूषण राठोड यांनी तक्रारदार यांच्या कडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केले होती या बाबत तक्रार यांनी समक्ष हजर राहून तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची आज दिनांक 25 जुलै रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल झालेल्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना पास करण्याचे मोबदल्यात सहा. मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड यांना तक्रारदार यांचे कडून तडजोडीअंती पंचासमक्ष नऊ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. राठोड यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.