Sunday, November 17, 2024
Homeराज्यनांदेड | अंगणवाडी कर्मचारी भरती बाबत कोणत्याही आमिषास, प्रलोभनास व भूलथांपाना बळी...

नांदेड | अंगणवाडी कर्मचारी भरती बाबत कोणत्याही आमिषास, प्रलोभनास व भूलथांपाना बळी न पडण्यांबाबत जाहिर आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात सध्या मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस यांची पदभरती प्रक्रिया चालू आहे, सदर प्रक्रिया ही उमेदवारांच्या पात्रतेच्या निकषानुसार अतिशय पारदर्शकरित्या करण्यांचे आवाहन याद्वारे सर्व संबंधितांना करण्यांत येत आहे.

मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या दोन्हीही पदांसाठी मह‍िला व बाल व‍िकास व‍िभाग, शासन न‍िर्णय द‍िनांक- 02.02.2023 नुसार इयत्ता 12 वी उत्तिर्ण ही शैक्षणिक अर्हता असून उमेदवार त्याच गांवातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच विधवा व अनाथ उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यांचे निर्देश आहेत याशिवाय पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड, बी.एड तसेच एम.एस.सी.आय.टी. व अंगणवाडीच्‍या कामकाजाच्‍या अनुभवासाठी देख‍िल अतिर‍िक्‍त गुण देण्‍यांचे न‍िर्देश आहेत. याशिवाय जात प्रवर्गासाठी देखिल अतिरिक्त गुणदान द्यावयाचे आहेत.

सदर भरती ही गुणवत्तेच्या आधारेच उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रानुसार गुणदान करण्यांत येवून त्याआधारे सर्वांत जास्‍त गुण प्राप्त करणा-या उमेदवाराचीच निवड करण्यांत येणार आहे, यासाठीची प्राथमिक गुणवत्ता यादी जिल्ह्यातील सर्व प्रकलप कार्यालयात दिनांक 31 जुलै 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर यादीवरील आक्षेप मागवून त्याचा निपटारा करण्यात येईल व गुणवत्तेच्या आधारे नियुक्तीस सर्व पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना दिनांक- 15 आँगस्ट 2023 पर्यंत नियुक्ती आदेश देण्यांत येणार आहेत.

सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शक करण्यांत येत असून इच्छूक उमेदवारांनी कोणत्याही भुलथापांना, आमिषाला अथवा कसल्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी न पडता भरती प्रक्रिया पूर्ण करण्यांस मदत करावी, सदर प्रकरणी कुणीही व्यक्ती अथवा शासकिय अधिकारी वा कर्मचारी रक्कमेची मागणी करित असतील तर त्यास विरोध करावा व त्यांचे विरोधात गुन्हा नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी रेखा काळम यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: