ऑटोत विसरलेल्या बॅगमधील चार लाख रुपयांचा मुद्येमाल नांदेड पोलीसांनी महिलेस परत मिळवून दिला…
नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील पुजा राहुल भट्टड रा. सातारा ह.मु. दिलीपसिंग कॉलनी वजिराबाद हयांनी दिनांक 24 मार्च रोजी गोविंद बाग गार्डन ते वजिराबाद ऑटोने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांची बॅग ऑटोत विसरुन राहीली.त्या बॅगमध्ये एक डायमंड ब्रासलेट किमत 3,50,000/- दोन मोबाईल किमत 45,000/- रुपये व नगदी रोख रक्कम 5000/- रुपये असा एकूण 4,00,000/- लाखाचा रुपयाचे चिज वस्तु गेल्या हे लक्षात आल्यावर त्यांनी पो.स्टे. वजिराबाद व पोलीस अधिक्षक यांची समक्ष भेट घेवून सर्व हकीकत सांगीतली.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लगेच सायबर पो.स्टे. चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी यांना सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यावरुन सायबर पो.स्टे.चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांना माहिती देवून घटनास्थळी पाठविले असता पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोविंद बाग गार्डन ते वजिराबाद येथील सिसिटीव्ही फुटेज तपासून तक्रारदार महिलेने सांगीतलेले ऑटोचालकाचे वर्णनावरुन चौकशी केली असता ऑटो नंबर MH26BD419 असल्याचे समजले.
त्यावरुन ऑटोचालकाचे नाव व पत्ता काढून सदर ऑटो चालक रुपसिंग रामसिंग मल्ली रा.लंगरसाहिव रोड नांदेड याची असल्याचे समजले . ऑटोचालकाचा शोध घेवून त्यास विचारपूस केली असता ऑटोचालक हा देखील विसरलेली बॅग देण्यास तयार होता पण सदर बॅग ही कोणत्या प्रवाशाची आहे हे त्याला समजत नव्हते.
व त्याने बॅग मधील सर्व मुद्येमाल जशास तसा ठेवला होता. आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे समक्ष तक्रारदार महिलेस बॅग व बॅग मधील मुद्येमाल जशास तसा परत मिळवून दिला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, पो.नि.जगदिश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अंमलदार राजेद्र सिटीकर, साहेबराव कदम, अनिल बिरादार यांनी पार पाडली.
सदर कामगीरी बाबत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ऑटो चालक रुपसिंग रामसिंग मल्ली व सर्व पोलीस अधिकारी व अंमलदाराचे अभिनंदन केले आहे तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना त्यांचे वाहनामध्ये प्रवाशाची विसरलेली कोणतीही वस्तु, मालमत्ता ही जवळच्या पोलीस स्टेशन येथे जमा करावी असे आवाहन केले आहे.