Saturday, July 13, 2024
spot_img
HomeUncategorizedरिंदा गैंग से बोल रहा हूँ असे म्हणून आठ कोटीची खंडणी मागणारा...

रिंदा गैंग से बोल रहा हूँ असे म्हणून आठ कोटीची खंडणी मागणारा नांदेड पोलीसांच्या ताब्यात…

नांदेड – महेंद्र गायकवाड

गँगस्टर रिंदा गँगचे नाव घेऊन आठ कोटीची खंडणी मागणाऱ्या नितीन सूर्यवंशीला खंडणीविरोधी पथकाने अटक केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.

शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 99/2024 कलम 384, 385, 386, 507 भांदवि प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खंडणी विरोधी पथकास आदेशित केले होते.

त्यावरून खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार,पोलीस उप निरीक्षक दशरथ आडे, यांनी सदर गुन्हयातील आरेपीचा शोध घेत असताना फिर्यादी मध्ये नमूद संशयित मोबाईल क्रमांक धारकाचे सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषन करुन सदर मोबाईल क्रमांक धारकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी नितीन सूर्यवंशी याने दि.21 फेब्रुवारी रोजी जूना मोबाईल खरेदी केला तेव्हा मोबाईल मध्ये व्हॅटसअॅपसह सर्व अॅप चालूच होते.

त्याला मार्केट मध्ये लोकांचे पैसे देणे असल्याने व खरेदी केलेल्या जून्या मोबाईल मध्ये व्हॅटसअॅप चालु असल्याने याचा फायदा घेऊन आरोपी नितीन संजय सूर्यवंशी याने व्हॅटसअॅप वापरुन त्याचे ओळखीचे फिर्यादीस रिंदा गंग से बोल रहा हूँ, बचना है तो असे म्हणून आठ कोटीची खंडणीची मागणी केली म्हणून आरोपी नितीन पि. संजय सूर्यवंशी वय 22 वर्षे रा. माळ सावरगाव ता. हदगाव जि. नांदेड ह. मु. सुरभी मंगल कार्यालयाजवळ एम. आय. डी. सी.सिडको, नांदेड यास अटक केली असून पुढील तपास सपोनि तुरनर पो. स्टे. शिवाजीनगर हे करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोनि. जगदीश भंडरवार, पोउपनि दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, हरजिंदरसिंघ चावला, पोहेकों राजु सिटीकर, दिपक ओढणे, पोना बंडु कलंदर, पोकॉ राजीव बोधगिरे, साहेबराव कदम, अनिल बिरादार, अशोक म्हस्के, इस्राईल शेख, अकबर पठाण यांनी पार पाडली

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: