नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी कांही अज्ञात व्यक्तींनी फोडली असल्याची घटना आज दुपारी घडली असून बालाजी कल्याणकर हे एका लग्न सोहळ्यानिमित्त अर्धापूर तालुक्यात गेले होते.
नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे एका लग्न सोहळ्यासाठी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा या गावी गेले होते. ते लग्न सोहळ्यात बसले असता कांही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी क्र.एम. एच.26 बी.सि.7771 हि उभी असते वेळेस गाडीच्या पाठीमागील काचा फोडल्या.सुदैवाने त्यावेळी गाडीत कोणीही नव्हते..