Monday, December 23, 2024
Homeराजकीयनांदेड - मुंबई व्हाया हिंगोली अकोला नवीन रेल्वे धावणार - खा. प्रतापराव...

नांदेड – मुंबई व्हाया हिंगोली अकोला नवीन रेल्वे धावणार – खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना पुन्हा यश…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड सह मराठवाडा आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना अधिकाधिक रेल्वेच्या शिवाय उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले असून आता नांदेड – मुंबई व्हाया हिंगोली अकोला ही नवीन रेल्वे धावणार आहे.

मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न मार्गी लावत असताना रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. नांदेडसह मराठवाडा आणि विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.

त्यामुळे मुंबईकडे जाणारे येणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक रेल्वे उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी वारंवार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली आहे. या अनुषंगाने आता दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड- मुंबई व्हाया हिंगोली- अकोला -भुसावळ -मनमाड ही नवीन रेल्वे सुरू होणार आहे. नांदेड येथून रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटाला निघणारी रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता मुंबई येथे पोहोचणार आहे. या रेल्वेचा निश्चितपणे नांदेड आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होईल असा विश्वास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: